शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ताबा पत्र एकाला, घर मात्र दुसऱ्याला...; मुलुंडमध्ये त्रिदेवच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:44 IST

हक्काच्या घरात जाण्याच्या विचारात असताना त्यापूर्वीच आपले फ्लॅट दुसऱ्यालाच विकल्याची धक्कादायक माहिती मिळाली...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टॉवरमधल्या घरात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. याच स्वप्नासाठी अनेक जण आयुष्याची जमापुंजी खर्च करतात. मुलुंडमध्येही याच स्वप्नासाठी एका कुटुंबातील वृद्ध वडिलांसह दोन मुलांनी गुंतवणूक केली. घराचे अलॉटमेंट लेटरही मिळाले. हक्काच्या घरात जाण्याच्या विचारात असताना त्यापूर्वीच आपले फ्लॅट दुसऱ्यालाच विकल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. अखेर, याच घरासाठी पोलिस ठाण्याबरोबर कोर्टाची पायरी झिजविण्याची वेळ कुटुंबीयांवर ओढवली. आठ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर मुलुंड पोलिसांनी  त्रिदेवच्या तीन संचालकांसह दलालाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 मुलुंड परिसरात राहणारे तक्रारदार रितेश यादव (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्रिदेव रिॲलिटी अँड कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट कंपनीचे डायरेक्टर पीयूष गोसर, मेहुल गोसर, दीपक गोसर आणि दलाल नरेंद्र ठक्कर, गोवर्धन मणिक, नरेश  गणात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. 

फ्लॅटची परस्पर विक्री एप्रिल २०१७ मध्ये फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी संचालकांना भेटताच त्यांनी, काही महिने थांबण्यास सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.  २०२० मध्ये बुकिंग केलेल्या फ्लॅटची दुसऱ्यांना परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत चौकशी करताच दमदाटी करत हाकलून दिल्याचे तक्रारदार रितेश यादव यांनी सांगितले. 

शेकडो जणांची फसवणूक अन् दबाव गुन्हा दाखल होण्यासाठी आठ वर्षे लागली. सुरुवातीला पोलिसही गुन्हा दाखल करून घेत नव्हते. अखेर कोर्टात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला. समोरची पार्टी त्यांचा दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासारख्या शेकडो जणांची यांनी फसवणूक केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणे गरजेचे आहे.      

- जगन्नाथ यादव      फसवणूक झालेले वृद्ध

प्रकरण काय ?

  • जुलै, २०१५ मध्ये यादव कुटुंबीयांनी जुन्या मालमत्ता विक्रीतून आलेल्या पैशातून नवीन फ्लॅटसाठी शोध सुरू केला. 
  • २०१६ मध्ये गणात्राने त्रिदेवच्या नेताजी सुभाषचंद्र बोस रोड,  कुलदीप ईशछाया  इमारतीत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार, तिन्ही संचालकांसोबत भेटीगाठी झाल्या. मुलुंडमध्ये टॉवरमध्ये घर होणार म्हणून यादन कुटुंबीयांनी १ कोटी ९१ लाख रुपये गुंतवले. 
  • पीयूष गोसरने त्यांचे प्रोजेक्ट प्लॅन दाखवून फ्लॅट २०६, ६०२ आणि ६०१ देण्याचे आश्वासन देत अलॉटमेंट लेटरही दिले.  २०१७ पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्यात येईल, अन्यथा प्रति स्क्वेअर फूट २४ हजार दराने रक्कम परत देण्यात येईल, असा करार झाला. सर्व पैसे धनादेशाद्वारे देण्यात आले. 
  • तिन्ही संचालकांनी ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा सांगत गुंतवणुकीस भाग पाडले. पैसे दिल्याच्या पावत्याही दिल्या. मात्र ना घर ना पैसे  घर न मिळाल्याने यादव यांनी पोलिसांत धाव घेतली.