पिंपरी : डॉक्टर महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ केला. व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. एकाच्या मध्यस्थीने ४ लाख रुपये घेतले. २०१० ते शुक्रवार, दि. २८ जुलै २०१९ रोजीपर्यंत हा प्रकार घडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र लसणे (वय ३०, रा. उलवेगाव, नवी मुंबई) व दीपक पाटील (रा. मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेला माफी मागण्याचे कारण सांगून लॉजवर घेऊन जाऊन गुंगीचे औषध देऊन आरोपीने फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. त्याचे मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढला. त्यानंतर २०१८ मध्ये पीडित महिलेचे नाव पत्ता शोधून काढून पुन्हा शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने नकार दिला असता व्हिडीओ पती व सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पती, तिला व मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध व अनैसर्गिक कृत्य केले. रविवारी (दि. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी रवींद्र लसणे व त्याचा मित्र दीपक पाटील याने पैसे घेण्यासाठी येऊन पुन्हा धमकी देऊन अत्याचार केला. तसेच वेळोवेळी दीपक पाटील याच्या मध्यस्थीने चार लाख रुपये घेतले. पीडित डॉक्टर महिलेच्या ओपीडीमध्ये पैसे नेण्यासाठी जाऊन दीपक पाटील याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
डॉक्टर महिलेवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:07 IST