शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra: तपासात सहकार्य केलं नाही म्हणून राज कुंद्राला अटक; पोलिसांची हायकोर्टाला माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 07:44 IST

राज कुंद्राच्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात राज कुंद्रावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) अंतर्गत केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. 

मुंबई : पोर्नोग्राफी फिल्म्सप्रकरणी तपासास सहकार्य करत नसल्याने व्यावसायिक राज कुंद्रा याला अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. 

राज कुंद्राच्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात राज कुंद्रावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) अंतर्गत केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने १९ जुलै रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. कुंद्रा याने पोलिसांनी आपल्याला अटक करण्यापूर्वी सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावली नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. मात्र, राज्य सरकारने हा दावा फेटाळला. कुंद्राला नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याने ती स्वीकारली नाही. त्याने नोटीस स्वीकारली नाही, याचा अर्थ त्याने तपासास सहकार्य करण्यास नकार दिला, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

चौकशीला बोलावण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावण्यात येते. या प्रकरणी कुंद्राला दोन तासांपूर्वीही नोटीस देण्यात आली नाही. १९ जुलै रोजी दुपारी त्याच्या कार्यालयाची झडती घेण्यास सुरुवात केली. सुमारे तीन-चार तास ही झडती सुरू राहिली. त्यानंतर त्यांनी कुंद्रा याला पोलीस ठाण्यात नेले आणि अटक केली, असा युक्तिवाद कुंद्रा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात केला. कार्यालयाच्या झडतीवेळी कुंद्रा व त्याचा आयटी टेक्निशियन रायन थॉर्प यांनी मोबाइलमधील व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करण्यास सुरुवात केली. ते पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राMumbai policeमुंबई पोलीस