शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:48 IST

Poojashree dies, dowry harassment : आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Poojashree dies, dowry harassment : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये हुंड्यासाठी छळ केल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे, २८ वर्षीय बँक कॅशियर एन पूजाश्रीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तिचा पती जे नंदीश आणि त्याची आई शांतम्मा यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना बेंगळुरूच्या बागलागुंटे भागातील आहे. ३० ऑगस्ट रोजी दुपारी पूजाश्रीने कपाटाच्या हुकला गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी तिचा पती आणि दीड वर्षांची मुलगी घरात नव्हती. कुटुंबाला घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची आई बी चंद्रकला यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि तिच्या मुलीच्या पती आणि तिच्या सासूवर गंभीर आरोप केले.

ती म्हणते की लग्नापासूनच मुलीला हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की लग्नाच्या तीन वर्षापासून पूजाश्री आणि नंदीशमध्ये तणाव होता. पूजाश्रीने नंदीशसोबत प्रेमविवाह केला होता. पण लग्नानंतर परिस्थिती बिघडू लागली.

घरगुती वादांमुळे वारंवार भांडणे होत असत.

हुंडा मागणीव्यतिरिक्त पूजाश्री तिच्या पतीच्या चारित्र्यावरही संशय घेत असे. तिला असे वाटत होते की तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. कालांतराने ते वाद वाढत गेले. नंदीशने पूजाश्रीला अनेक वेळा मारहाणही केली. या वादांमुळे पूजाश्री मानसिकदृष्ट्या खचली.

आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा छळाचा गुन्हा

पोलिसांनी सांगितले की चंद्रकला यांच्या तक्रारीच्या आधारे नंदीश, त्याची आई शांतम्मा आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळाचे कलम लावण्यात आले आहे. नंदीशला ३१ ऑगस्ट रोजी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :dowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाhusband and wifeपती- जोडीदार