शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये बेफाम वाहन चालकांविरोधात पोलीस नोंदविणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:04 IST

निष्काळजीपणे वाहने पळविणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे नोंदविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

औरंगाबाद : नियम मोडून वाहन चालविल्याने अपघात होतात, हे माहीत असूनही निष्काळजीपणे वाहने पळविणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे नोंदविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विशेष म्हणजे यात ट्रिपलसीट दुचाकीचालक आणि राँगसाईडने वाहने पळविणारे वाहनचालक पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, जालना रस्त्यावर जडवाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बीड बायपास हा पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आला होता. आता बायपासच्या पलीकडे नागरी वसाहती अस्तित्वात आल्याने या रस्त्यावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली. परिणामी, या रस्त्यावर अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आॅगस्ट महिन्यात बायपासवर वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचे मृत्यू झाले. अपघात रोखण्यासाठी बायपासवरील जडवाहतूक सकाळी आणि सायंकाळी प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी नुकताच घेतला. असे असताना आज आणखी एका जणाचा अपघातात मृत्यू झाला. सुसाट जीपचालकामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. बायपासवर राँगसाईडने वाहने पळविणाऱ्यांमुळेही प्राणांतिक अपघाताचा धोका अधिक आहे. 

गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले ट्रिपलसीट दुचाकीचालक, सुसाट आणि राँगसाईडने वाहनचालक, सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका अधिक असतो. सिग्नल तोडून पळणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. शिवाय कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही जीव धोक्यात घालावा लागतो. या कारवाईचा क ोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याने अशा वाहनचालकांविरोधात भादंवि २७९ कलमानुसार गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.-डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त