शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत पोलिसांनी जप्त केले ५०० कोटींचे पाचूचे शिवलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:25 IST

त्रिची : तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) मूर्ती शाखेने (आयडॉल विंग) तंजावूर येथील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून तब्बल ...

त्रिची : तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) मूर्ती शाखेने (आयडॉल विंग) तंजावूर येथील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून तब्बल ५०० कोटी रुपये किमतीचे पाचूचे शिवलिंग जप्त केले आहे.

सीआयडीच्या मूर्ती शाखेचे एडीजीपी के. जयंती मुरली यांनी चेन्नईत पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तंजावूर येथील अरुलानंद नगरातील लंगवल होम्स येथे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला. एन. एस. अरुण याची चौकशी करण्यात आली. 

अरुण याने पोलिसांना सांगितले की, त्याचे ८० वर्षीय वडील एन. ए. सामियप्पन यांनी तंजावूर येथील एका बँक लॉकरमध्ये हे शिवलिंग ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी सामियप्पन याची चौकशी केली. त्याने बँक लॉकरमधून शिवलिंग काढून दिले.पोलिसांनी सांगितले की, एकाच पाचूमध्ये काेरण्यात आलेल्या या शिवलिंगाचे वजन ५३० ग्रॅम असून उंची ८ सें.मी. आहे. रत्नपारखींद्वारे त्याची शुद्धता तपासण्यात आली. त्यात शिवलिंग शुद्ध पाचूचे असल्याचे आढळून आले. त्याची बाजारभावानुसार किंमत ५०० कोटी रुपये आहे.

मंदिरातून चोरल्याची शंकापोलिसांनी सांगितले की, हे शिवलिंग दक्षिण भारतातील एखाद्या मंदिरातून चोरलेले असू शकते. ते कोणत्या मंदिराशी संबंधित आहे, याचा शोध वैज्ञानिक तपासणीच्या माध्यमातून घेतला जाईल. २०१६ मध्ये नागपट्टीणम जिल्ह्यातील थिरुकुवलाई येथील शिवमंदिरातून एक पाचूचे शिवलिंग चोरीला गेले होते. ते हेच आहे का, हेही पडताळून पाहिले जात आहे.इंडिया प्राईड प्रकल्पाचे सहसंस्थापक एस. विजयकुमार यांनी सांगितले की, शिवलिंगाची अंदाजित किंमत ५०० कोटी रुपये गृहित धरणे ही निव्वळ कल्पना आहे. दक्षिण भारतातील मंदिरातून पाचूच्या शिवलिंगांच्या चोऱ्या होण्याच्या घटना १९८० च्या दशकापासून घडत आहेत.