शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुली बेपत्ता झाल्याच्या शक्यतेने पोलिसांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 06:20 IST

घरी न सांगता मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे पोलिसांची सोमवारी रात्री काही काळ धावपळ उडाली.

मुंबई : घरी न सांगता मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे पोलिसांची सोमवारी रात्री काही काळ धावपळ उडाली. मुलीच्या पालकांनी मेघवाडी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पथके राबवून मंगळवारी रात्रभर शोधमोहीम राबविली. मात्र त्या अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात सुखरुप आढळल्याने पोलिसांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.जोगेश्वरीतील पूजा (नावात बदल) ही तेरा वर्षांची मुलगी सोमवारी काहीच न सांगता घरातून निघून गेली. बरीच शोधाशोध करूनही ती न सापडल्याने अखेर ती हरवल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली.या तक्रारीनुसार तिचा शोध घेत असतानाच याच परिसरातील तिची मैत्रिण निशा (नावात बदल) ही बेपत्ता असल्याचे उघडकीस आले. कुणीतरी त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मेघवाडी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० ने या दोन्ही मुलींचा शोध सुरू केला.तांत्रिक तपासासोबत स्थानिक खबऱ्यांची मदतदेखील घेण्यात आली. तपासाअंती अंधेरी रेल्वेस्थानक परिसरात या दोघींचे लोकेशन पोलिसांना सापडले. त्यानुसार दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता एका मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी एकत्र तिच्यासोबत गेलो होते, असे या मुलींनी पोलिसांना सांगितले. तेथून घरी परतताना उशीर झाला असे उत्तरही त्यांनी पोलिसांना दिले. दोघींनाही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुली सापडल्याने त्यांच्या कुटुंबानेही सुटकेचा श्वास टाकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी