शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी पाली पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:39 IST

गेल्या एक वर्षापासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पाली पोलीस ठाण्याच्या आरोपी शोध पथकाने ३० सप्टेंबर २०१८ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील जंगलभागात मोठ्या शिताफीने अटक करून पाली पोलीस ठाण्यात आणले.

पाली : गेल्या एक वर्षापासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पाली पोलीस ठाण्याच्या आरोपी शोध पथकाने ३० सप्टेंबर २०१८ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील जंगलभागात मोठ्या शिताफीने अटक करून पाली पोलीस ठाण्यात आणले.पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील आंबवणे आदिवासीवाडी येथील राहणारा आरोपी राजा उर्फ राजू काळू पवार याच्यावर १० आॅगस्ट २०१७ रोजी पाली पोलीस ठाण्यात चोरी-दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून राजा उर्फ राजू पवार हा फरार झाला होता.त्याला शोधण्यासाठी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नारायण चव्हाण यांचे शोधपथक पुणे जिल्ह्याला रवाना झाले. ते आरोपी पवार हा राहत असलेल्या मुळशी तालुक्यातील आंबवणे आदिवासीवाडी येथे पोहोचले. तेथील पोलीस पाटील यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता, तो आरोपी तेथील जंगलात राहत असल्याची माहिती मिळाली.पोलीस उप निरीक्षक चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी ३० सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे तेथील जंगलात आरोपीचा शोध घेण्यास सुरु वात केली असता, सकाळी ८ च्या सुमारास तो आरोपी एका महिलेसह एका ठिकाणी दिसला असता, मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला पाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी राजा उर्फ राजू काळू पवार बेड्या ठोकल्याने पाली पोलिसांचे कौतुक होत आहे.