शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...म्हणून आईनं चिमुकलीला गळा आवळून संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:50 IST

मुलीचा खून करणाऱ्या आईला पोलिसांकडून अटक

मडगाव: परदेशात जहाजावर नोकरीला असल्यामुळे पतीशी संवाद नाही. घरी असलेल्या सासूशी पटत नाही, अशा अवस्थेत नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या एका मातेने आपल्याच अडीच वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना दक्षिण गोव्यातील बेताळभाटी येथे घडली असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी अझीया रॉड्रीगीस या महिलेला अटक केली आहे.

नागवाडा-बेताळभाटी येथे मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही खूनाची घटना घडली. बुधवारी त्या मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता तिचा गळा आवळून आणि हाताने नाक व तोंड दाबून गुदमरुन खून केल्याचे उघड झाले. बुधवारी सायंकाळी या महिलेला फॉरेन्सिक चाचणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती कोलवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहूल परब यांनी दिली. या प्रकरणात आरोपीची सासू सेबेस्तियाना रॉड्रिगीस यांनी कोलवा पोलिसात तक्रार दिली होती.

अझीयाचा पती जहाजावर कामाला आहे. त्याने अझीयासोबतचा संवाद जवळ जवळ बंद केला होता. तिला त्याचे फोनही येत नसत. अशातच तिचे सासूशीही पटत नसल्यामुळे एकाच घरात रहात असून त्यांचा एकमेकांशी संवाद नव्हता. अशा परिस्थितीत कीम या लहान मुलीचा आपल्यावर विनाकारण बोजा पडत असल्याची भावना तिच्यामध्ये वाढत गेल्यानेच ही खूनाची घटना घडल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले. 

मंगळवारी दुपारी अझीयाची सासू सेबेस्तियाना शेजारच्या घरात गेली असता अझीया आपल्या एका शेजारणीला घेऊन कोलवा पोलीस स्थानकात हजर झाली होती. सासू आपला छळ करत असल्याचा कांगावा तिने पोलीस स्थानकात केला. दरम्यान, तिची सासू घरी आली असता आपली नात निपचीत पडलेली तिला आढळली. तिला उठवण्याचा प्रयत्न करुनही ती उठत नसल्याचे पाहून तिच्या सासूने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. सदर मुलगी मृत झाल्याचे दिसून आल्यावर शेजाऱ्यांनी फोनवरुन पोलिसांना वर्दी दिली. त्याही अवस्थेत त्या मुलीला रुग्णालयात आणण्यात आले. पण तिचा त्यापूर्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Murderखूनgoaगोवा