शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

गुन्हेगारांना मारण्याचा परवाना पोलिसांना दिलेला नाही; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 07:57 IST

लखनभय्या बनावट चकमक प्रकरणात प्रदीप शर्माला शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: २००६ च्या लखनभय्या बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. रामनारायण गुप्ता याच्यावर १० गुन्हे दाखल केले असले तरी पोलिस किंवा अन्य कोणालाही त्याच्या हत्येचा परवाना दिलेला नाही. याप्रकरणात कायद्याचे पालन करण्याऐवजी पोलिसांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत रामनारायणची हत्या केली. नागरिकांचे रक्षण करणे, हे सर्व आरोपी पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र, ते त्यांचे कृत्य त्यांच्या कर्तव्याशी विसंगत होते, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

पोलिसांना गणवेशधारी गुन्हेगार होण्याची मुभा नाही!

पोलिस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंना आळा घातला पाहिजे. त्याकडे गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलावी लागतील. सरकारचे शस्त्र आणि नागरिकांचे रक्षणकर्ते, कायद्याचे पालन करणारे पोलिसच आरोपी असल्याने त्यांना दया दाखवण्यास जागा नाही. कायदा हातात घेऊन नागरिकांविरोधात क्रूर गुन्हा करण्याची त्यांना परवानगी नाही. कायद्याच्या पालनकर्त्यांना गणवेशधारी गुन्हेगार म्हणून कर्तव्य करण्याची परवानगी देऊ शकत नाही. जर, अशा कृत्यांना परवानगी दिली तर अराजकता माजेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

राज्य एसआयटीची कामगिरी लज्जास्पद

  • या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल भेडा याची आरोप निश्चितीपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याचे अपहरण आणि हत्येचा तपास २०११ पासून राज्य सीआयडीकडे आहे.
  • सरकारी वकिलांनी या तपासाचा अहवाल सादर केला असता तपासात काहीही प्रगती नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. 
  • हत्येला एका दशकाहून अधिक काळ लोटला तरीही तपास पूर्ण झालेला नाही, ही बाब लज्जास्पद आहे. या घटनेतला एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल भेडाची न्यायालयात साक्ष देण्यापूर्वी हत्या करण्यात आली. त्याचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. 
  • ही न्यायाची चेष्टा आहे. कायद्याचे पालन करण्याचे ज्यांचे कर्तव्य आहे, अशा पोलिसांनी भेडाच्या मारेकऱ्यांना शोधण्याची तसदी घेतलेली नाही.
  • पोलिसांचा यंत्रणेवरचा विश्वास उडू नये, यासाठी सीआयडी तपास पूर्ण करेल, अशी आशा आम्ही करतो, असेही न्यायालयाने नमूद केले. 

काय आहे प्रकरण?

  • ११ नोव्हेंबर २००६ रोजी पोलिसांनी रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या व त्याचा मित्र अनिल भेडा यांना वाशीमधून पकडले आणि वर्सोवा येथे लखनभय्याची बनावट चकमकीत हत्या केली. तर अनिल भेडाला एक महिना डांबून ठेवले.
  • याप्रकरणी लखनभय्याच्या भावाने उच्च न्यायालयात धाव घेत हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची विनंती केली.
  • न्यायालयाने त्याचे म्हणणे मान्य करत एसआयटी स्थापन केली आणि एसआयटीने सखोल तपास करून शर्मा व अन्य पोलिसांनी लखनभय्याची बनावट चकमकीत हत्या केल्याचे उघड केले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
  • २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने २२ आरोपींपैकी २१ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर प्रदीप शर्माची निर्दोष सुटका केली. या सर्वांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. तर लखनभय्याचा भाऊ आणि राज्य सरकारने प्रदीप शर्माच्या निर्दोष मुक्तततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

एसआयटीचे केले कौतुक

आरोपींनी केलेला गुन्हा उजेडात आणण्यासाठी एसआयटीने प्रामाणिकपणे मेहनत घेतली. अनेक साक्षीदार फितूर होत असतानाही एसआयटीने उल्लेखनीय कामगिरी केली. एसआयटीचे प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना, मनोज चाळके, विनय घोरपडे, सुनील गावकर यांनी प्रामाणिकपणे काम करत पुरावे गोळा केले.

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माMumbaiमुंबईPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय