शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 02:26 IST

सीसीटीव्ही फूटेज दोषारोपपत्राला जोडले : सुसाइड नोटमध्ये दोन मोठ्या घटनांचा उल्लेख

मुंबई : पायल तडवी आत्महत्या प्रकरणी क्राइम ब्रँचने तिन्ही डॉक्टर आरोपींवर मंगळवारी विशेष न्यायालयात सुमारे १८०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, या तिन्ही डॉक्टर आरोपींच्या जामिनावर उच्च न्यायालय गुरुवारी सुनावणी घेणार आहे.या दोषारोपपत्रात पायल तडवीने लिहिलेल्या सुसाइड नोटची प्रत आहे. तडवीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती आली नसली तरी तडवीने त्या सुसाइड नोटचे मोबाइलमधून फोटो काढले होते. फॉरेन्सिक लॅबला तिच्या मोबाइलमधून सुसाइड नोटचा फोटो मिळाला आहे. त्या नोटची तीन पाने दोषारोपपत्राला जोडण्यात आली आहेत.

२२ मे रोजी पायलला संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांनी हेमा आहुजाचा फोन आला होता. या दोघी फोनवर १२१ सेकंद बोलल्या. त्यानंतर ५ वाजून ०४ मिनिटांनी पायललने तिच्या सुसाइड नोटचा मोबाइलमध्ये फोटो घेतला. त्याशिवाय पायलच्या रूमबाहेरील सीसीटीव्ही फूटेजही दोषारोपपत्राला जोडले आहे. पायलने आत्महत्या केल्यानंतर आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिच्या रूमवर गेल्या होत्या. आठव्या मजल्यावर तडवीची रूम होती. तडवीला ट्रामा सेंटरमध्ये नेण्यासाठी लिफ्टपर्यंत या तिघी आल्या. त्यानंतर पुन्हा या तडवीच्या रूममध्ये गेल्या. त्यामुळे या तिघींनी तडवीची सुसाइड नोट नष्ट केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.तडवीने तिच्या सुसाइड नोटमध्ये दोन मोठ्या घटनांचा उल्लेख केला आहे. पहिला म्हणजे २१ मे रोजी पायलने तिच्या मैत्रिणींसोबत केलेल्या जेवणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल या तिघींनी तिची खरडपट्टी काढली. जेवणाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करायला वेळ आहे, मात्र काम करण्यासाठी वेळ नाही, अशा शब्दांत या तिघींनी तिला दरडावले. तर दुसरा प्रसंग, पायल तडवी २२ मे रोजी ऑपरेशन थिएटरमध्ये गेली असताना रुग्णांसमोर व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसमोर या तिघींनी तिचा अपमान केला.या तिघींवर तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा व पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच अँटी रॅगिंग अ‍ॅक्ट आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (हिंसाचार प्रतिबंध) कायद्यांतर्गतही आरोप ठेवण्यात आला आहे.

क्राइम ब्रँचने दोषारोपपत्रात १५० साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात आरोपींनी ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या रुग्णांसमोर व कर्मचाऱ्यांसमोर पायलचा अपमान केला, त्यांचाही समावेश आहे. यामधील महत्त्वाची साक्षीदार म्हणजे पायलची मैत्रीण स्नेहल. आरोपी डॉक्टर पायलवर सतत जातीवेचक टिपणी करून तिला मानसिक त्रास देत होत्या, असे स्नेहलने पोलिसांना सांगितले आहे.

जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणीविशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या तिघींच्या जामीन अर्जावर गुरुवार, २५ जुलै रोजी सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले.आरोपींची जामिनावर सुटका करायची की नाही, हे तीन बाबींवर ठरेल. आरोपींची जामिनावर सुटका केल्यावर त्या फरार होण्याची शक्यता आहे का? आरोपी पुराव्यांची छेडछाड करू शकतात का? आणि आरोपी समाजासाठी घातक ठरू शकतात का? या तिन्ही बाबींचा गुरुवारी सुनावणीदरम्यान विचार करू, असे स्पष्ट करीत न्या. दमा नायडू यांनी जामिनावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीCourtन्यायालय