शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हॉटेलच्या पोर्चमध्ये गाडी पार्क करताय? सावधान! पार्किंगमधून कर्मचारीच करतात वस्तू गायब

By गौरी टेंबकर | Updated: January 7, 2024 06:24 IST

वाॅलेट पार्किंगमधून कर्मचारीच करतात मौल्यवान वस्तू गायब...

गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हाॅटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर वाॅलेट पार्किंगसाठी गाडीची चावी विश्वासाने कर्मचाऱ्याच्या हाती सोपवतो. मात्र, हाच विश्वास अनेकांना महागात पडत आहे. वाॅलेट पार्किंगमधून कर्मचारीच वाहनातील किमती ऐवजावर हात साफ करत असल्याचा प्रकार एमएचबी कॉलनी पोलिसांच्या कारवाईतून समोर आला. त्यामुळे वाॅलेट पार्किंगमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

बीकेसीमध्ये एमएमआरडीएची पे अँड पार्क व्यवस्था आहे. याठिकाणी वाहनांचे दर बोर्डनुसार सांगितले. मात्र, पैसे काढण्यासाठी कर्मचारी वाॅलेट पार्किंगचा आधार घेताना दिसले. चावीची काळजी घ्यायची असल्यास वाॅलेट पार्किंग घ्यावी लागेल सांगून त्याचे दर बोर्डच्या दरापेक्षा दुप्पट असल्याचे दिसून आले. ही मुले रस्त्याच्या ठिकठिकाणी बसलेली असतात. त्यांच्याकडे चौकशी करताच तेही एमएमआरडीएसाठी काम करत असल्याचे सांगतात. रस्त्याकडेला वाहन पार्क होताच ही मंडळी त्यांच्याकडून चावी घेत पार्किंगसाठी येथील पे अँड पार्ककडे आणतात.

काय काळजी घ्याल?

  • मौल्यवान वस्तू, रोख रक्कम किंवा महत्त्वाची कागदपत्रे गाडीत ठेवू नका.
  • चावी अनोळखी व्यक्तीला न देता गाडी स्वतः पार्क करा.
  • पार्क गाडीचा आणि तुमचा मोबाइल नंबर अटेंडन्टला द्या. जेणेकरून काही समस्या असल्यास तो तुम्हाला संपर्क करेल.

तुमची कार वाॅलेट पार्किंगसाठी दिली आणि ती गायब झाली तर त्या चोरीसाठी संबंधित हाॅटेल जबाबदार राहील. कारमधील ऐवजाची जबाबदारी गाडीच्या मालकाची असेल. - ॲड. विशाल सक्सेना, सर्वोच्च न्यायालय

आमच्याकडे वाॅलेट पार्किंग चोरी प्रकरण दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही ताब्यात घेतले. तो गेल्या २० वर्षांपासूनचा कर्मचारी असल्याने मालकाचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तक्रारदाराची गाडी तो पुढे-मागे करताना दिसला व फसला. त्यामुळे असा काही प्रकार घडल्यावर आधी पोलिसांकडे तक्रार करा. - सुधीर कुडाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमएचबी काॅलनी ठाणे

पालिकेचे पे अँड पार्क जिते आहे तेथील पार्किंगचे दर बऱ्याच लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे ते  रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या पार्क केल्या जातात. ते कमी केल्यास नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. पार्किंग प्लॉट नेमके कुठे उभारता येतील, याबाबतही मी संबंधितांना पत्रव्यवहार केला आहे.- ॲड. गॉडफ्रे पीमेंटा, समाजसेवक

यापूर्वीच्या घटना

  • डिसेंबर, २०२३ : बोरिवली पश्चिमेच्या फ्यूजन किचन हॉटेलमध्ये इनोव्हा गाडी घेऊन दर्शिल डोडिया (वय ३४) हे जेवायला आले. तेव्हा त्यांनी गाडी रमेश बंडू शिंदे (३३) या वाॅलेट पार्किंग कर्मचाऱ्याला दिली. त्याने त्यांच्या गाडीतून बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. अखेर, एमएचबी कॉलनी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने शिंदे याला अटक करत चोरीला गेलेले दागिने हस्तगत केले.
  • एप्रिल, २०२३ : वांद्रे पश्चिमेच्या हॉटेल वाॅटर येथे जेवायला गेलेल्या करणराज साही (३९) यांची सिक्युरिटी एजन्सी आहे. ते बिझनेस पार्टनरसोबत जेवायला गेले असताना त्यांनी त्यांची गाडी वाॅलेट पार्किंगसाठी दिली. त्यावेळी त्यातून इअरपॉड, मॅकबुक तसेच रोख २० हजार रुपये चोरण्यात आले. या प्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
टॅग्स :Parkingपार्किंगhotelहॉटेल