शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आईबापाने दीड वर्षाचे बाळ ४.६५ लाखांना विकले, आता डी एन नगर पोलिसांकडून ६ जणांना अटक

By गौरी टेंबकर | Updated: May 27, 2024 14:06 IST

आरोपीत तृतीयपंथी, समलिंगी पार्टनरचाही समावेश

मुंबई: स्वतःच्या फायद्यासाठी एका बाळाची  (१ वर्ष ७ महिने ) विक्री एका समलिंगी जोडप्याला करणाऱ्या आई-वडिलांसह सहा जणांना डी एन नगर पोलिसांनी अटक केली. त्यात एका तृतीपंथीचाही समावेश असून बाळाची सुखरूप सुटका करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे नजमीन शेख (बाळाची आई), तिचा पती मोहम्मद आझाद शेख उर्फ बादशाह, एजंट सकीनाबांनो शेख, राबिया परवीन अन्सारी , सायबा अन्सारी (तृतीय पंथीय) आणि गे पार्टनर इंद्रदिप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल अशी आहेत. नजमीन आणि आझाद यांचं हे बाळ आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नजमिन ही डी एन नगर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तिच्या बाळाची विक्री झाल्याची तक्रार केली. तिच्या म्हणण्यानुसार, 'शेजारीण सकिना हिने तिचा साहेब चित्रपट क्षेत्रात बाळाला काम मिळवून देईल. त्या बदल्यात दिवसाचे तुम्हाला २ ते ३ हजार रुपये मिळतील असे सांगितले. ती भेटायला गेल्यावर त्याठिकाणी साहेबाने माझ्या मुलाला घेत मला १० हजार रुपये दिले. मात्र काही दिवस होऊनही त्यांनी मुलाला परत आणले नसल्याने मी त्यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी पुन्हा काही रक्कम माझ्या हातावर ठेवत तुमचा मुलगा तुम्हाला मिळणार नाही आम्ही त्याला विकलेय असे सांगितले.' नजमीनच्या माहितीवरून, परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राजतीलक रोशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंदर मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देसले, सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार, उपनिरीक्षक सीमा खान, कॉन्स्टेबल स्मिता पेडणेकर, हेड कॉन्स्टेबल गोविंद पवार, कॉन्स्टेबल वारे, लाडे या पथकाने तपास सुरू केला. तपासात ते पनवेलमध्ये मेहरवालपर्यंत पोहोचले तेव्हा सत्य काही वेगळेच निघाले. 

'सायबानेच आम्हाला बाळ विकले!' 

मेहरवालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सायबाने त्यांना ४.६५ लाखांना बाळ विकले होते. त्यानुसार पोलिसांनी सायबा आणि अन्य आरोपीकडे चौकशी केली. तेव्हा मुलाचे आई-वडील नजमीन आणि आझाद यांनीच सायबा, राबिया व सकिना या एजंटच्या मदतीने पोटच्या पोराला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र मुलाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली असे तिचे म्हणणे आहे. डी एन नगर पोलिसांकडून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याच्या बदल्यात आरोपींनी घेतलेली रक्कम आझादने एका दिवसात खर्च केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार अधिक चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी