शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींच्या 'तोडपाणी'चं पालघर कनेक्शन; प्रभाकर साईल डीपीचा दुरूपयोग केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 20:55 IST

Twist In Aryan Khan case : मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे.

ठळक मुद्देह्या संभाषणादरम्यान 25 कोटीची मागणी करून 18 कोटींची डील फिक्स करून त्यातील 8 वानखेडे यांना देऊन बाकी 10 आपण वाटून घेऊ असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता.

हितेंन नाईक

पालघर - मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात  साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खान च्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता.तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना असून प्रभाकर साईल ह्यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याची आणि ह्या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणात एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांचे खाजगी बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका वृत्त वाहिनीवर प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहितीदरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. ह्या संभाषणादरम्यान 25 कोटीची मागणी करून 18 कोटींची डील फिक्स करून त्यातील 8 वानखेडे यांना देऊन बाकी 10 आपण वाटून घेऊ असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता. ह्याच सॅमने माझ्या मार्फत चर्चगेट जवळील एका हॉटेल जवळ 38 लाख रुपये घेतल्याची माहिती दिली.

प्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील एक व्यापारी हेनिक बाफना ह्यांचा असून मी प्रभाकर साईलला दोन महिन्यापूर्वी व्यवसायानिमित्त भेटलो होतो. मात्र माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नसल्याबाबत तक्रार अर्ज पोलीस अधिक्षकाकडे दिला आहे. माझा प्रोफाइलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी करीत असल्याचे बाफना ह्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. माझी बदनामी करणाऱ्या प्रभाकरवर कडक कारवाईची मागणी ही त्या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.आरोपी किरण गोसावी हा पालघर जिल्ह्यातील मनोर येथील रहिवासी असून त्याचे पालघरमध्ये अनेक वेळा फेऱ्या मारल्याची माहिती पुढे येत असून त्याचा अनेक लोकांशी व्यवहार झाल्याची चर्चा आहे. 

 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानExtortionखंडणीSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोpalgharपालघर