शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:56 IST

जया साहाच्या कबुलीने बॉलीवूडचा चेहरा उघड; नैराश्यामुळे अनेक जण ड्रग्जच्या आहारी

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील तारे-तारकांना चित्रपट, जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहाने गरजेनुसार त्यांना ड्रग्ज पुरविल्याची धक्कादायक बाब तिच्या चौकशीतून समोर आली. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सुशांतसिंह राजपूत यांना सीबीडी आॅइल पुरविल्याचीही कबुली तिने दिल्याचे समजते.जयाकडे एनसीबी सलग गेले तीन दिवस सखोल चौकशी करीत आहे. क्वान कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जयाचे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू आहे. तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित ‘सीबीडी आॅइल’ची आॅनलाइन तजवीज केल्याची कबुली दिली. याशिवाय रिया चक्रवर्ती, सुशांत, चित्रपट निर्माता मधू मांटेना, स्वत:साठीही सीबीडी आॅइल मागविले होते. मात्र आतापर्यंत कोणत्याही ड्रज तस्कराशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले. नैराश्यात असल्याने अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी गेल्याचे तिने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.एनसीबीकडून चित्रपट निर्माता मधू मांटेनासह तिघांकडे कसून चौकशीएनसीबीने जयाकडे बुधवारी सहा तास चौकशी केली. तिच्यासह मधू मांटेना, ‘क्वान’ टॅेलेन्ट व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत विचारणा करण्यात आली.सुशांत शेवटच्या भेटीतविक्षिप्तपणे वागलाकुमार मंगल यांच्या आगामी चित्रपटासाठी ५ जून रोजी आपली सुशांतशी शेवटची भेट झाली. त्याला चित्रपटाची कथा आवडली होती. त्यासाठी त्याला सहा कोटींची आॅफर होती. मात्र त्याने १२ कोटी रुपये मागितले होते, अशी माहिती जयाने दिली. त्या भेटीवेळी सुशांत अतिशय विक्षिप्तपणे वागला. मध्येच उठून चालायचा, बेडरूममध्ये जायचा, असेही तिने जबाबात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.चित्रपट, जाहिरातींसाठी केले होते साईन‘ड्राईव्ह’, ‘सोनचिरीया’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ या चित्रपटांसाठी जयाने सुशांतला साईन केले होते. ‘ड्राईव्ह’साठी त्याला सव्वादोन कोटी रुपये मिळाले होते. ‘दिल बेचारा’साठी साडेतीन कोटी, ‘छिछोरे’, ‘सोनचिरीया’साठी प्रत्येकी पाच कोटी मिळाले होते. जयाने सुशांतला २०१६ ते २०१९ दरम्यान अनेक जाहिराती तसेच कार्यक्रमांसाठीही साईन केले होते.दोन टीव्ही कलाकारांच्या घरांची झडतीड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने एनसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री दोन टीव्ही कलाकारांच्या घराची झडती घेतल्याचे समजते. अ‍ॅबीगेल, सनम अशी त्यांची नावे आहेत. ड्रग्ज तस्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराची पाहणी केली. मात्र फारसा काही मिळाले नाही.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतShraddha Kapoorश्रद्धा कपूरDrugsअमली पदार्थ