शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशाच्या पर्समधून एक लाखाची पोत लंपास, वाशिमची घटना

By सुनील काकडे | Updated: February 20, 2023 17:37 IST

एसटी बसमध्ये घडला प्रकार, चोरटा झाला फरार

सुनील काकडे, वाशिम: जिल्ह्यातील रिसोड येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या रिसोडातील महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली. हा प्रकार २० फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आला. दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रिसोड शहरातील आसन गल्ली परिसरात वास्तव्याला असलेल्या कविता संतोष हमाने ह्या जालना येथे जाण्याकरिता रिसोड-औरंगाबाद बसमध्ये चढल्या. बसचा प्रवास सुरू होऊन रिसोड शहरातीलच मालेगाव नाका येथे बस पोहोचल्यानंतर पर्समधून सोन्याची दोन तोळे वजनाची पोत आणि ४ हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे कविता हमाने यांच्या लक्षात आले. हा प्रकार उघडकीस येताच बसमध्ये मोठी खळबळ माजली. त्यानंतर पुढचा प्रवास थांबवून चालकाने बस रिसोड पोलीस स्टेशनमध्ये आणून उभी केली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली; मात्र सोन्याची पोत कोणाकडेही आढळून आली नाही. याबाबत कविता हमाने यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी