छपरा - आज सगळीकडे Valentine Day चा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु बिहारच्या छपरा येथे घडलेल्या विचित्र घटनेमुळे अनेकांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. व्हॅलेंटाईन डे वीकमुळे प्रेमी युगलांमध्ये प्रत्येक दिवस साजरा करण्याचं वेड लागले आहे. मग त्यात रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रपोज डे, हग डे, किस डे असे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. परंतु बिहारमध्ये प्रेयसीनं एका गोष्टीला नकार दिला म्हणून युवकाने धक्कादायक पाऊल उचललं आहे.
बिहारच्या सारण इथं एका युवकानं प्रेयसीसोबत झालेल्या भांडणातून झोपेच्या गोळ्या खात जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हा युवक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये किस डेच्या दिवशी तरुणाने प्रेयसीकडे किसची मागणी केली होती, त्याला प्रेयसीनं नकार दिला. ही मागणी पूर्ण न झाल्याने प्रियकराने एकाच वेळी झोपेच्या १० गोळ्या खाल्ल्या.
सदर रुग्णालयात उपचार सुरू त्यानंतर कुटुंबीयांनी युवकाला तातडीने आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला सदर हॉस्पिटल छपरा येथे रेफर केले. २५ वर्षीय शशी कुमार असं तरुणाचे नाव आहे. शशी याच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच KISS DAY च्या निमित्ताने KISS च्या मागणीवरून प्रेयसीसोबत भांडण झाले होते. यानंतर प्रियकर शशीने रागाच्या भरात झोपेच्या १० गोळ्या खाल्ल्या आणि आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याआधी बिहारच्या दरभंगामध्ये दोन तरुणांनी एका अनोळखी तरुणीला आय लव्ह यू म्हटले होते, त्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. दरभंगाच्या LNMU कॅम्पसमध्ये एक मुलगी स्कूटी चालवायला शिकत होती. यावेळी तिची आईही तेथे उपस्थित होती. दरम्यान, दोन मुले मोटारसायकलवरून तेथे पोहोचली आणि मुलीला आय लव्ह यू म्हटलं. हे ऐकून मुलीनं न ऐकल्यासारखे केले. यानंतर दोन्ही मुले काही वेळाने पुन्हा तेथे पोहोचले आणि नंतर मुलीला जोरात आय लव्ह यू म्हणाले. त्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला, त्यानंतर आईने पोलिसांना सांगितले मग दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.