शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वृद्ध चौकीदाराची हत्या : डोक्यावर मारले फटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 22:49 IST

स्टील कंपनीत चौकीदारी करणाऱ्या एका वृद्धाच्या डोक्यावर फटके मारून त्यांची हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास चिखली चौक परिसरात ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देकळमन्यात गुन्हा, आरोपींची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टील कंपनीत चौकीदारी करणाऱ्या एका वृद्धाच्या डोक्यावर फटके मारून त्यांची हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास चिखली चौक परिसरात ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. नामदेवराव मंगरूजी बावणे (वय ६९) असे मृताचे नाव असून ते विनोबा भावेनगरात राहत होते.गेल्या चार महिन्यांपासून बावणे चिखली चौकातील आर. जी. स्टील इंडस्ट्रीजमध्ये चौकीदार म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ते घरून कर्तव्यावर गेले. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह पडून आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच कळमना ठाणे तसेच गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी आजूबाजूच्यांना विचारणा केली. मात्र, कुणीही मारेकºयाबाबत फारशी माहिती दिली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. मात्र, त्यातून पक्का धागा मिळेल, अशी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री कंपनी परिसरात दोन-तीन आरोपी संशयास्पद फिरत दिसल्याने बावणे यांनी त्यांना हटकले. त्यामुळे आरोपींनी बावणे यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने फटके मारले. बावणे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्यांना खुर्चीवर बसवून तेथून पळ काढला. दरम्यान, शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून पोलीस त्या संशयितांचा माग काढत होते. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा छडा लागला नव्हता.कारण गुलदस्त्यातवृद्ध चौकीदाराने हटकले म्हणून कुणी त्याची हत्या करेल, हा मुद्दा पोलिसांना पटेनासा आहे. बावणे यांना पत्नी आणि दोन मुले असल्याचे समजते. त्यांनी वृद्ध बावणे यांचे कुणाशी वैमनस्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे या हत्येच्या मागे नेमके कोणते कारण असावे,असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून