शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी ओला कॅबचालकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 20:13 IST

कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. 

पुणे : कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. 

सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२,रा. लोहगाव) असे खून झालेल्या ओला चालकाचे नाव आहे.तपेशकुमार पुखराम चौधरी (वय ३२ राहणार -जोधपूर, राजस्थान) कॅब घेऊन पसार झालेल्या संशयितांचा पोलिसांनी माग काढल्यावर ते गाडीसह गुजरात येथे असल्याची माहिती उपलब्ध झाली़ होती. त्यानुसार  गुजरात पोलिसांची मदत घेण्यात आले. त्यांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी सदर प्रकार केल्याचे सांगितले आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा कात्रज रोडवरील आईएमडी स्कुलसमोरील मैदानात सकाळी फिरायला आलेल्या लोकांना एक मृतदेह पडला असल्याचे आढळून आले़ होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा फोटो व्हायरल करून संबंधित व्यक्तीची ओळख पटवली. त्यात मृत शास्त्री हे ओला कॅब चालक असल्याचे समोर आले. त्यांच्या कंपनीच्या मदतीने बघितल्यावर गाडीचे लोकेशन गुजरात राज्यातील वापी दाखवत होते. त्यानुसार गाडीचा प्रवास लक्षात घेऊन अमिरगड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. दुसरीकडे पुणे पोलिसांचे पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले होते. तेथे गुजरात राजस्थान बॉर्डरवर आरोपीला पकडण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या तपासात आरोपीने हा गुन्हा कबूल केला. मयत शास्त्री यांच्याकडील स्वीफ्ट गाडीतून राजस्थानमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा त्याचा इरादा होता. त्याकरिता शःस्त्री यांचा खून केल्याचेही सांगितले. या आरोपीच्या विरोधात अजून गुन्हे दाखल आहेत का याचा शोध घेणे सुरु आहे. 

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पंकज पवार , उपनिरीक्षक संतोष शिंदे, सागर काळे आदींनी तपास केला. 

टॅग्स :MurderखूनOlaओलाDrugsअमली पदार्थ