शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोर्टात सुरू होती ऑनलाइन सुनावणी, अचानक चालू झाला अश्लील व्हिडीओ अन् त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:05 IST

व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान लॉग इन करून दाखवला आक्षेपार्ह व्हिडिओ

obscene video in online hearing of Court: न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडीओ चालवल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही काळात समोर आली आहेत. अवघ्या आठवडाभरापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अश्लील व्हिडिओ दाखविण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच राज्यात अशी घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयानंतर आणखी एका न्यायालयीन कामकाजा दरम्यान एक अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला. कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (KSAT) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणी दरम्यान एक अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला. ऑनलाइन सुनावणीदरम्यान अश्‍लील व्हिडीओ दाखविण्यात आल्याने न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले. परिणामी न्यायालयाचे ऑनलाइन कामकाज घाईघाईने थांबवावे लागले. त्यानंतर न्यायालयाने एक कठोर निर्णय घेतला.

या प्रकरणी KSAT अधिकाऱ्याने बेंगळुरूमधील सेंट्रल सेन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान लॉग इन करून आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी ऑनलाइन सुनावणी रद्द केली. या प्रकरणी आयटी कायद्याच्या कलम 67, 67 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू आहे.

आठवड्याभरापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान एक अश्लील चित्रपट दाखवण्यात आला होता. संगणक विभागाच्या निबंधक कार्यालयातील एन. सुरेशने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. न्यायालयीन कामकाजात व्यत्यय येण्याची पार्श्वभूमी आय.टी. विभागाने तपासली आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी कलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर येताच कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरू, धारवाड आणि कलबुर्गी खंडपीठांमधील न्यायालयांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयKarnatakकर्नाटक