शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड व्हिडीओ कॉल, स्क्रिन रेकॉर्डिंग! ४३ लाख उकळणारा आरोपी जेरबंद

By कमलाकर कांबळे | Updated: December 27, 2023 20:38 IST

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, राजस्थान येथून आरोपीला अटक, नवी मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन अनेकांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला नवी मुंबई सायबर पोलिसांनी राजस्थान येथून जेरबंद केले आहे. हलीम फरीद खान (१९) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका फिर्यादीला अशाच प्रकारे धमकावून त्याच्याकडून ४३ लाख २२ हजार ९०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या फिर्यादीच्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

आरोपी हलीम खान याने फिर्यादीला व्हॉटसॲपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. फिर्यादीला न्यूड व्हिडीओ कॉल करून त्या कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांच्या माध्यमातून ४३ लाख २२ हजार ९०० रुपये उकळले. या प्रकाराने त्रस्त झालेल्या फिर्यादीने अखेर सायबर पोलिसांकडे याविषयी तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. फिर्यादीने ज्या बँक खात्यात रक्कम पाठविली होती. त्या बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख आणि ठिकाण निश्चित केले. त्यानंतर सापळा रचून आरोपीला राजस्थानच्या उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम गावातून त्याला अटक केली. दरम्यान आरोपीकडून अनेक मोबाइल, विविध कंपन्यांचे सीमकार्ड, विविध बँकांचे एटीएम कार्ड जप्त केले आहेत.

राज्यातील १३ जणांंना गंडवले

अटक केलेल्या या आरोपीने महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास १३ जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपीने फिर्यादीकडून उकळलेले ४ लाख १२ हजार १७५ रुपये संबधित बँक खात्यातून गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहुल तसेच सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी