शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात बाल्या मानेला पुन्हा अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:06 IST

ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला मारहाण करून पाच हजाराची खंडणी वसूल करण्याच्या आरोपात अटक केल्यानंतर पोलिसांवर मारहाणीचा आरोप लावणारा कुख्यात गुन्हेगार बाल्या ऊर्फ संदीप माने (रा. शनिवारी, गुजरवाडी गणेशपेठ) याला गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी पुन्हा अटक केली.

ठळक मुद्देकारागृहातून घेतले ताब्यातव्यावसायिकाला मारहाण करून खंडणी उकळल्याचा आरोपगणेशपेठ पोलिसांनी तीन दिवसात दुसऱ्यांदा केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला मारहाण करून पाच हजाराची खंडणी वसूल करण्याच्या आरोपात अटक केल्यानंतर पोलिसांवर मारहाणीचा आरोप लावणारा कुख्यात गुन्हेगार बाल्या ऊर्फ संदीप माने (रा. शनिवारी, गुजरवाडी गणेशपेठ) याला गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी पुन्हा अटक केली. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील खंडणीची रक्कम मिळवण्याचे आहे आणि त्याच्या अन्य साथीदारांनाही अटक करायची आहे, असे मुद्दे मांडून पोलिसांनी न्यायालयातून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला.मॉडेल मिल चाळीत राहणारे नितीन नत्थूजी नगराळे (वय ४२) यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी २१ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनुसार, नगराळेंचे गणेशपेठमधील जाधव चौकात श्री साई टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स नावाने कार्यालय आहे. १० डिसेंबरच्या दुपारी २ ते २.३० च्या सुमारास कुख्यात बाल्या माने त्याच्या नऊ साथीदारांसह नगराळे यांच्या कार्यालयात येऊन नगराळेसमोर खुर्चीवर बसला. काय काम आहे, असे विचारले असता, बाल्या माने को पहचानता नहीं क्या, असे तो म्हणाला. नगराळेने ओळखत नसल्याचे म्हणताच, बाल्या आणि त्याच्या साथीदारांनी नगराळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी बाल्या व त्याच्या गुंड साथीदारांना तेथून हाकलून लावले. यावेळी बाल्याने धंदा करायचा असेल तर पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जीवे ठार मारेन, असे म्हटल्याचे नगराळेंनी तक्रारीत म्हटले आहे. धमकीला घाबरून बाल्याला पाच हजार रुपये दिल्यानंतर ही रक्कम हिसकावून बाल्या आणि त्याचे साथीदार पळून गेल्याचेही तक्रारीत नगराळेने नमूद केले आहे. जीवाच्या धाकामुळे नगराळे बरेच दिवस गप्प बसले, नंतर २० डिसेंबरला त्यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्याची माहिती कळताच वरिष्ठांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, गणेशपेठ पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी बाल्याला शनिवारी रात्री अटक केली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले.पोलिसांसोबत शह आणि मातचा खेळ !पोलीस त्याचा पीसीआर मिळवण्याच्या तयारीत असताना बाल्याने पोलिसांवरच मारहाणीचा आरोप लावला. त्यामुळे न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडीऐवजी न्यायालयीन कस्टडीत (कारागृहात) पाठविण्याचे आदेश दिले. बाल्याने पोलिसांच्या कस्टडीतून निसटून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केल्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी त्याच रात्री प्रतीक वामन लांबट (वय २८) तसेच विलास गजानन बांबलवार (वय २६, रा. गुजरवाडी गणेशपेठ) या दोघांना अटक केली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्यांनाही न्यायालयीन कस्टडीत पाठविण्यात आले. दरम्यान, मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे पोलिसांनी बाल्याला कारागृहातून ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. बाल्याकडून अनेक गुन्ह्याची उकल होऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक