शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Gang Rape : आरोपीची दया याचिका फेटाळा, राष्ट्रपतींकडे गृह मंत्रालयाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 14:59 IST

Nirbhaya Case : राष्ट्रपती या दया याचिकेवर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठळक मुद्देगृह मंत्रालयाने २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी विनय शर्मा यांच्या दया याचिकेची फाईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली आली दया याचिका फेटाळून लावावी अशी गृह मंत्रालयाने शिफारस केली.

नवी दिल्ली - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे आज हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला आणि संपूर्ण देशात हैदराबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया हत्याकांडातील एका आरोपीने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दयेची याचिका दाखल केली आहे. गृह मंत्रालयाने २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी विनय शर्मा यांच्या दया याचिकेची फाईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली असून दया याचिका फेटाळून लावावी अशी गृह मंत्रालयाने शिफारस केली. यापूर्वी दिल्ली सरकारने दयेची याचिका रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे राष्ट्रपती या दया याचिकेवर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.निर्भयाकांडातील आरोपी विनय शर्मा याने दयेची याचिका केली आहे. त्याची दयेची याचिका रद्द करण्यात यावी, अशी शिफारस दिल्ली सरकारने केली होती. दिल्ली सरकारचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शिफारशीची फाइल नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पाठवली होती. दया याचिका करणाऱ्या आरोपींने अत्यंत घृणास्पद गुन्हा केलेला आहे. अशा प्रकारचे अत्याचार रोखणं गरजेचं आहे. त्यामुळे हे गुन्हे रोखण्यासाठी पुन्हा कोणी अशाप्रकारचा गुन्हा करण्यास धजावणार नाही, अशी शिक्षा या आरोपीला केली पाहिजे. दया याचिका निराधार आहे, ही याचिका रद्द करण्यात यावी, असं दिल्ली सरकारने केलेल्या शिफारशीत म्हटलं आहे. ४ नोव्हेंबर रोजी आरोपी शर्माने ही दयेची याचिका केली आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपी असून कोर्टाने या चारही जणांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपHome Ministryगृह मंत्रालय