शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या आदल्या रात्री साहिलनं हत्येचं रहस्य उघडलं; ऐकून नवविवाहित बायको हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:15 IST

जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता असं पोलिसांनी कोर्टात सांगितले.

नवी दिल्ली - निक्की हत्याकांडातील आरोपी साहिल गहलोतला कोर्टाने बुधवारी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निक्कीची हत्या करून साहिलने ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह ठेवला होता त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. निक्कीच्या हत्येचं रहस्य आरोपी साहिलने लग्नानंतर ३ दिवसांपर्यंत लपवून ठेवले होते. मात्र अटकेच्या आदल्या रात्री साहिलने त्याच्या पत्नीसमोर हे गूढ उकललं असं पोलिसांनी कोर्टात म्हटलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता. त्याने नव्या नवरीला निक्कीच्या हत्येबद्दल सांगितले आणि त्यानंतर तिला माहेरी जा असं म्हटलं. निकटवर्ती गावाच्या विधवा महिलेच्या एकलुती एक मुलीसोबत डिसेंबर २०२२ मध्ये साहिलच्या लग्नाची बोलणी झाली होती. लग्नाची तारीखची निश्चित झाली. दोघांच्या कुटुंबाने १० फेब्रुवारीला लग्न करायचं ठरवलं. लग्नाच्या दिवशी सकाळी साहिलने निक्की यादवची हत्या केली होती. त्यामुळे त्याच्या मनात अन्य विचार घोंगावत होते. 

मात्र, लग्नानंतर तीन दिवस त्याने पत्नीला याबाबत काहीही सांगितले नाही. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच नजफगडच्या बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पहिल्या दिवसापासून साहिलचा शोध घेत होते. पोलिसांचा दबाव वाढल्यावर १३ फेब्रुवारीच्या रात्री साहिलने पत्नीला सांगितले की, मी एका मुलीची हत्या केली आहे त्यामुळे तू माहेरी जा. नवविवाहित महिलेने मंगळवारी सकाळी आईला फोन करून सर्व प्रकार सांगितला. विधवा आईने कुटुंबातील आणि शेजारच्या काही लोकांना मुलीच्या सासरी पाठवले. याठिकाणी दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर ठरल्याप्रमाणे लोकांनी मुलीसाठी दिलेला हुंडा आणि मुलीला घेऊन परत आले.

साहिलच्या विश्वासघातामुळे आई-लेकीला बसला धक्कालग्नानंतर काही काळ त्रास सहन करत असलेली आई आणि मुलीला या प्रकाराचा खुलासा होताच धक्का बसला. मुलीच्या वडिलांचे सुमारे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून आई-मुलगी कष्टाने जगत होत्या. कधी आई आपल्या मुलीला घेऊन माहेरी जायची तर कधी ती गावातच राहायची. गेल्या अनेक वर्षांपासून आई व मुलगी दूध विकून आयुष्य जगत होत्या. गावातील सरकारी शाळेत शिकून मुलगी बारावी उत्तीर्ण झाली. पैसे जमा करून आईने मुलीचे लग्न साहिलसोबत केले. आता पुन्हा आईला मुलीच्या भवितव्याची चिंता लागली आहे.