शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मावशीचा खून करणाऱ्या भाचीला जन्मठेपेची शिक्षा; चाकूने केले होते वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 09:13 IST

खोपट येथील घटना: प्रताप सिनेमाजवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या स्वप्ना आणि तिची मावशी शोभा यांच्यात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जोरदार वादावादी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नाश्ता बनवला नाही या क्षुल्लक कारणावरून शोभा गणेश कुलकर्णी (७५) या वयोवृद्ध मावशीच्या डोक्यावर आणि डोळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या स्वप्ना सुधीर कुलकर्णी (३९, रा. खोपट, ठाणे) हिला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांनी सुनावली. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली.

प्रताप सिनेमाजवळील विनायक भवन येथे राहणाऱ्या स्वप्ना आणि तिची मावशी शोभा यांच्यात ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जोरदार वादावादी झाली. याच भांडणामध्ये रागाच्या भरात स्वप्ना हिने शोभा यांच्या डोक्यावर आणि डाव्या डोळ्यावर किचनमधील चाकूने वार करून तिचा खून केला. भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून आरोपी स्वप्ना हिने स्वत:च्या अंगावरील कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपासासाठी आलेल्या राबोडी पोलिसांना मावशी पलंगावरून पडल्यामुळे मृत पावल्याचे कारण सांगितले. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी, पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे आणि उपनिरीक्षक हर्षल कुमार गावित यांना या वृद्धेच्या डोक्यावर जखमा आढळल्या. तसेच घरातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळले. त्याचवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात  ७ ऑक्टोबर २०१८ रोजी शवविच्छेदन झाले. या अहवालातही तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी स्वप्ना कुलकर्णीला अटक केली. 

    या खटल्याची सुनावणी ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणकर यांच्या न्यायालयात शुक्रवारी झाली. अतिरिक्त सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे तपासले. यात प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता.     मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर न्या. ताम्हणकर यांनी आरोपी स्वप्ना हिला मावशीच्या खुनासाठी जन्मठेप तसेच दहा हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कैैदेची शिक्षा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालय