शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 08:04 IST

गेल्या पाच वर्षांत बँकेच्या राखीव निधीतून मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला असून, ते या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचेही म्हटले आहे.

आर्थिक गुन्ह्यांमध्ये खटल्याला वेळ लागतो, त्यामुळे दीर्घ काळ तुरुंगात राहणे हे जामीन देण्याचे कारण ठरू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मेहता हे बँकेचे माजी महाव्यवस्थापक आणि अकाउंट्स प्रमुख होते. गेल्या पाच वर्षांत बँकेच्या राखीव निधीतून मोठ्या प्रमाणात अपहार  केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विक्रम जगदाळे यांनी जामीन अर्जावर सुनावणी करताना आरोपपत्र आणि पोलिस  अहवाल पाहून मेहता हे मुख्य आरोपी असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. मेहता हे गेल्या एक वर्षाहून  अधिक काळापासून तुरुंगात आहेत.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, मेहता यांनी बनावट आणि खोटे इलेक्ट्रॉनिक नोंदी तयार केल्या, त्यामध्ये डेबिट नोट्स आणि बँकेचे मौल्यवान बाँड्सचा  समावेश होता आणि त्याद्वारे सुमारे १२२ कोटी रुपये अपहार करण्यात आले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : New India Bank Scam: Ex-General Manager Hitesh Mehta's Bail Rejected

Web Summary : Hitesh Mehta, ex-General Manager of New India Co-operative Bank, was denied bail in the ₹122 crore scam. The court noted Mehta's central role in the embezzlement, involving forged electronic records and misuse of bank funds. He remains in custody after over a year.
टॅग्स :fraudधोकेबाजीCourtन्यायालयbankबँक