शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:03 IST

घरात काम करणाऱ्या लोकांवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी अतिशय महागात पडू शकतो. अशीच एक घटना बंगळुरूतील एका सराफा सोबत घडली आहे.

घरात काम करणाऱ्या लोकांवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी अतिशय महागात पडू शकतो. अशीच एक घटना बंगळुरूतील एका सराफा सोबत घडली आहे. कर्नाटकच्या बंगळुरू जिल्ह्यातून चोरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका नेपाळी जोडप्याने आपल्या साथीदारांसोबत  मिळून सराफाच्या घरात चोरी केली. यात त्यांनी एक परवानाधारक बंदूक,  दोन किलो सोनं आणि १० लाखांची रोकड घेऊन घेऊन पळ काढला आहे. बंगळुरूच्या एचएएलजवळील लाल बहादुर शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या  ५५ वर्षीय व्यावसायिक रमेश बाबू यांच्या घरी ही चोरी झाली आहे. 

घरातील ऐवज लांपास करून पसार झालेले हे नेपाळी जोडपे रमेश बाबू यांच्या घरी काम करायचे. त्यांची नावे राज आणि दीपा अशी आहेत. राज आणि दीपा यांनी रमेश बाबूच्या घरी तीन महिन्यांपूर्वीच काम करायला सुरुवात केली होती. तीन महिन्यांतच या जोडप्याने रमेश बाबू आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. २७ मे रोजी रमेश त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह तिरुपतीला गेले. चोरीसाठी हा चांगला काळ आहे हे समजून, नेपाळी जोडप्याने आणि त्यांच्या साथीदारांसोबत मिळून घराचा मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा तोडून चोरी केली.

शेजऱ्यांनी तपासताच उघड झाला गुन्हा! दरम्यान, २८ मे रोजी सकाळी रमेश यांनी आपल्या मोबाईल फोनवर घरातील सीसीटीव्ही तपासला. मात्र, त्यावेळेस तो सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळले. त्यांना वाटले की वीज गेल्यामुळे सीसीटीव्ही काम करणे बंद झाले असेल, म्हणून त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून तपासण्यास सांगितले. रमेश यांचे शेजारी घरी जाताच, तिथे चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एचएएल पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर, आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे. 

नियोजन करून घातला दरोडा!ही चोरी नियोजन करून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे . नेपाळी जोडप्याव्यतिरिक्त, त्यांचे इतर तीन साथीदार देखील यात सहभागी होते. पोलीस उपायुक्त शिवकुमार गुणारे म्हणाले की, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :RobberyचोरीBengaluruबेंगळूर