शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ऋषिकेशच्या मागे तपास यंत्रणा, सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टच्या सहाय्य्क संचालकाचा शोध घेतंय एनसीबी  

By पूनम अपराज | Updated: January 8, 2021 18:56 IST

Sushant Singh Rajput : सुशांतला ड्रग्ज पुरवण्यात पवारचा हात असल्याचा संशय एनसीबीला आहे.

ठळक मुद्देऋषिकेश पवार हजर राहिला नाही. पवारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे, म्हणून आता एनसीबी त्याचा शोध घेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत गेल्या वर्षी जूनमध्ये त्याच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आला होता, या प्रकरणात ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) आता त्याच्या आधीच्या ड्रीम प्रोजेक्टचे सहायक संचालक ऋषिकेश पवार हा चौकशीसाठी पाहिजे आहे. एनसीबी आता पवारचा शोध घेत आहेत. सुशांतला ड्रग्ज पुरवण्यात पवारचा हात असल्याचा संशय एनसीबीला आहे.

ऋषिकेश पवार याच्या घराच्या झडतीदरम्यान एजन्सीला त्याच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद नोंद सापडली होती, त्यानंतर एनसीबीने त्यांना समन्स पाठवून हजर होण्यास सांगितले होते.  पण ऋषिकेश पवार हजर राहिला नाही. पवारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे, म्हणून आता एनसीबी त्याचा शोध घेत आहे.

पवारला शोधण्यासाठी एनसीबी कंबर कसत आहेत. कारण, सुशांतच्या कुक असलेल्या दिपेश सावंत यांनीही आपल्या जबाबत ऋषिकेश पवार  हे नाव घेतले होते आणि सुशांतला ड्रग्ज पुरवण्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे. अमली पदार्थ विरोधी एजन्सीने सुशांत प्रकरणापासून त्याची तपासणीची व्याप्ती फिल्म आणि टीव्ही उद्योगात पसरलेल्या ड्रग्ज पुरवठा करणार्‍यांच्या साखळीपर्यंत वाढविले आहे. या एजन्सीने ड्रग अँगलच्या तपासणीत अनेक लोकांची चौकशी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, त्याच वेळी आता हे प्रकरण संपूर्ण चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या नावांपर्यंत पोहोचले आहे.दुसरीकडे, याप्रकरणाची मुख्य चौकशी करत असलेल्या सीबीआयला इतक्या महिन्यांनंतरही अंतिम अहवाल दाखल करता आला नाही. गेल्या महिन्यात राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) एक पत्र लिहून तपासाची स्थिती जाणून घेण्यास सांगितले होते, त्यास उत्तर म्हणून सीबीआयने म्हटले आहे की, सध्या या प्रकरणाची सखोल व व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली जात आहे. यासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्रेही वापरली जात आहेत. तपासणी दरम्यान मृत्यूच्या सर्व बाबींचा विचार केला जात आहे आणि कोणत्याही अँगलमधील बारीक धागेदोरे देखील नाकारले जात नाही आहेत.

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थ