शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीवर NCBचा छापा, बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 00:17 IST

NCB raids drug party: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान जहाजामध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून जहाजामध्ये गेले आणि ही कारवाई केली.

मुंबई - एनसीबीच्या एका पथकाने ड्रग्स पार्टीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान जहाजामध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून जहाजामध्ये गेले. त्यानंतर गेल्या सात तासांपासून ही कारवाई सुरू आहे.  मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कार्डेलिया या जहाजावर ग्रीन गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. (NCB raids drug party on luxury ship, arrests 10 including Bollywood actor's son)

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली आहे. ते आपल्या टीमसह मुंबईमध्ये संबंधित जहाजामध्ये दाखल झाले होते. दरम्यान, हे जहाज समुद्रात पोहोचल्यावर तिथे ड्रग्स पार्टीला सुरुवात झाली. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन होत होते. त्याचवेळी एनसीबीच्या टीमने कारवाई सुरू केली. एनसीबीचे पथक प्रवासी बनून गेल्याने या कारवाईची कुणकुण कुणालाही लागली नाही. तसेच सर्व आरोपींना रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर २ व ३ ऑक्टोबरसाठी मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. आज रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, एनसीबीने या कारवाईवेळी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेतले. त्याशिवाय १० अन्य आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीकडून पहिल्यांदाच जहाजावरील ड्रग्स पार्टीचा भांडाफोड करण्यात आल्याने ही कारवाई अधिक मोठी मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जहाजाचे हल्लीच अनावरण झाले होते. तसेच त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपली कला सादर केली होती.

आता रविवारी या पार्टीमध्ये पकडल्या गेलेल्या सर्व आरोपींना मुंबईत आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या सात तासांपासून एनसीबीचे पथक भर समुद्रात ही कारवाई करत आहे. एनसीबीने याआधी अनेकवेळा कारवाया केल्या आहेत. मात्र अशा प्रकारचे सिक्रेट ऑपरेशन हे क्वचितच केले जाते. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्टीदरम्यान, एनसीबीचे पथक जहाजावर आहे याची माहिती कुणालाही नव्हती. त्यामुळेच आरोपी अधिक बिनधास्त होते. त्यामुळे ते सहजपणे एनसीबीच्या जाळ्यात सापडले.     

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी