शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

जळगाव जामोद तालुक्यातील नाथजोगी तरुणाची रायगड जिल्ह्यात हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 19:55 IST

Youth from Jalgaon Jamod taluka Murderd in Raigad district : नाथजोगी समाजाच्या तरुणाची रायगड जिल्ह्यातील उरण येथे हत्या करण्यात आली.

जळगाव जामोद : तालुक्यातील मोहिदेपूर येथील नाथजोगी समाजाच्या तरुणाची रायगड जिल्ह्यातील उरण येथे १९ जून रोजी हत्या करण्यात आली.मोहिदेपूर येथील नाथ जोगी समाजाचे तरुण बहुरूप्यांची विविध रूपे धारण करून महाराष्ट्रातील अनेक गावात भिक्षा मागत फिरत असतात. त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन २०१२ मध्ये नागपूरच्या जरीपटका भागात अशा प्रकारे भिक्षा मागत असताना तीन तरुणांची त्या भागातील नागरिकांनी हत्या केली होती. नऊ वर्षानंतर अशीच घटना रायगड जिल्ह्यातील उरण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. तेजराव शालिग्राम सोळंके (वय ३५) मोहिदेपुर येथील तरूण आपल्या परिवारासह त्या भागात राहत होता १९ जून रोजी तेजराव सोळंके व त्याचा सहकारी तेजराव वामन चव्हाण हे दोघे भिक्षा मागण्यासाठी बहुरूप्याच्या वेशात उरण येथे फिरत होते. दरम्यान त्यांची चुकामुक झाली. त्यानंतर रात्री तेजराव चव्हाण हा त्याच्या ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे खोलीवर त्याला शोधण्यासाठी गेला. परंतु तेजराव सोळंके हा घरी परत आलाच नसल्याचे दिसुन आले. त्यानंतर तेजराव चव्हाण व मृतकांची पत्नी सुनीता यांनी उरण पनवेल व कळवा या पोलीस स्टेशनला तेजराव सोळंके हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह उरण जेएनपीटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आला.

त्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन पत्नी व मोहिदेपुरच्या नागरिकांनी बुलडाणा गाठले. नाथजोगी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन माहिती दिली व निवेदन दिले. मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मोहीदेपुर वासियांनी घेतली होती. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि मोहिदेपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तेजराव सोळंके याच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत. तसेच तेजरावचे आई वडील हयात असून वडिलांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत.

 

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वीकारले पालकत्व

     दोन दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी रयत क्रांती चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे आले असताना त्यांनी मोहिदेपूर येथे या कुटुंबाची भेट घेतली आणि हा प्रश्‍न शासन दरबारी लावून धरण्याचे आश्वासन देत त्यांनी या कुटुंबातील सर्व सदस्यांची पालनपोषणाची व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यामुळे या कुटुंबाला आधार मिळाला आहे. अनेक मान्यवरांनी मोहिदेपूर येथे भेट देत या कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या आणि सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCrime Newsगुन्हेगारी