शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 09:25 IST

Narayan Rane Arrest: राज्याच्या पोलीस दलाकडून यापूर्वी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना जून २००१ मध्ये अटक करण्यात आली होती.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक केली. गेल्या २० वर्षांमध्ये राज्य पोलिसांनी अटक केलेले राणे पहिले केंद्रीय कॅबिनेट मंत्री ठरले आहेत. तर मंत्रीपदावर असताना अटक झालेले तिसरे नेते आहेत. तीनही मंत्री राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीचेच आहेत.

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले...

राज्याच्या पोलीस दलाकडून यापूर्वी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना जून २००१ मध्ये अटक करण्यात आली होती. दोघांनाही मध्यरात्री चेन्नईमध्ये अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर अटक करण्यात आली होती. त्यावेळी मारन आणि बालू यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी यांनाही अटक केली होती. त्यानंतर आता राणे यांना अटक झाली आहे. 

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

मारन आणि बालू यांच्याविरोधात चेन्नईतील १२ कोटी रुपयांच्या ‘फ्लायओव्हर घोटाळ्या’शी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाली होती. मारन हे त्यावेळ तत्कालीन केंद्रीय उद्योग मंत्री होते.  अटकेदरम्यान मारन आणि बालू दोघेही किरकोळ जखमी झाले होते. दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस तातडीने चेन्नईला गेले होते. त्यानंतर या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची जामिनावर सुटका झाली होती. आता राणे यांना बाहेर काढण्यासाठी भाजपचे नेतृत्व कोणती पावले उचलणार, याकडे लक्ष लागले आहे.

Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार

परिस्थिती वेगळीतीनही नेत्यांच्या अटकेमागील कारणे आणि परिस्थिती मात्र अतिशय वेगळी आहेत. राणे यांना दिवसाढवळ्या अटक करण्यात आली. तसेच  राणेंची अटक ही गुन्हेगारी प्रकरणात झालेली नाही. याउलट मारन आणि बालू यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे ministerमंत्रीArrestअटक