शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये पूर्ववैमनस्य आणि गटबाजीच्या वर्चस्वातून कुख्यात गुन्हेगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:24 IST

कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याची हत्या पूर्ववैमनस्यातून तसेच गटबाजीमध्ये वर्चस्वाच्या भांडणातून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले.

ठळक मुद्देकुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याचे ३० मार्च २०१८ रोजी मालेगाव हद्दीतील स्वराज्य ढाब्यावरुन अपहरण करण्यात आले होते.त्याचा खून करुन प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नांदेड : कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याची मालेगाव हद्दीतील स्वराज्य ढाबा येथून अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. सदर गुन्हा पूर्ववैमनस्यातून तसेच गटबाजीमध्ये वर्चस्वाच्या भांडणातून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याचे ३० मार्च २०१८ रोजी मालेगाव हद्दीतील स्वराज्य ढाब्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा खून करुन प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना व पोलीस निरीक्षक शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.या घटनेसंबंधी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. 

याप्रकरणी लखन दशरथसिंह ठाकूर, विक्की दशरथसिंह ठाकूर, ईश्वरसिंह जसवंतसिंह गिरणीवाले (सर्व रा. चिखलवाडी), विक्की राम चव्हाण (कुंभारगल्ली), विशाल ऊर्फ ए.व्ही. आंबे, सौरभ ऊर्फ दीपक संजय टाकळीकर (रा.शिवशक्तीनगर), रवी नारायणसिंग ठाकूर (रा. रविनगर, जुना कौठा) यांच्यासह तीन बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विनोद दिघोरे, पोउपनि कल्याण नेहरकर, सदानंद वाघमारे, पोलीस जमादार दशरथ जांभळीकर यांच्यासह पोलीस शिपाई बालाजी सातपुते, राजू पांगरीकर, जसवंतसिंघ शाहू, रमेश खाडे, माधव केंद्रे, संग्राम केंद्रे, धोंडिबा केंद्रे, मनोज परदेशी, मोतीराम पवार, चालक श्रीरामे आदींनी तपासासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी विक्की चव्हाण हा सध्या नांदेड कारागृहात असून त्याचा  हस्तक विक्की दशरथसिंह ठाकूर व ईश्वरसिंग जसवंतसिंग गिरणीवाले हे सध्या फरार आहेत. पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून जाळलेकृष्णा खाटीकसह आरोपी असलेले यांच्यात गुन्हेगारी गट होते. या गटात पूर्ववैमनस्य तसेच वर्चस्वाचे भांडण सुरू होते. यातूनच कृष्णा खाटीकची हत्या करण्यात आली. आरोपी चार मोटारसायकलवरुन खाटीक याचा शोध घेत होते. ३० मार्च रोजी कृष्णा खाटीक यास ढाब्यावरुन जबरीने पकडून खंजीरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर मोटारसायकलवर बसून त्याचे अपहरण केले आणि कौठा- असर्जन बायपासच्या नवीन पुलाच्या पश्चिम बाजूस गोदावरी नदी पात्रानजीकच्या बाभळीच्या जंगलात नेवून त्यास जबर मारहाण करण्यात आली. यात कृष्णा खाटीकचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावर लाकडे आणि मोटारसायकल मधील पेट्रोल टाकून जाळण्यात आले.

टॅग्स :MurderखूनNanded policeनांदेड पोलीसArrestअटक