शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:20 IST

अब्दुल मोचीन इद्रिस खान (२८), चेतन सुरेश वाघ ऊर्फ कोबरा ऊर्फ सैफ (२४) आणि मोहम्मद झिशान अब्दुल अबरार अहमद (३४) अशी तिघांची नावे

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): महिला पायी चालत जात असताना त्यांच्या गळ्यातून सोन्याची चेन खेचून पळून गेलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. बोळींजच्या सखाराम संकुलमधील अमृत योग इमारतीत राहणाऱ्या रंजना कालेकर (५३) यांच्या गळ्यातून २० जुलैला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास सोनसाखळी चोरली. त्या आपल्या नातीला शाळेत सोडून जकात नाका येथून पायी रस्त्याने घरी जात होत्या. त्यावेळी आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी झटापट करून गळ्यावर दुखापत करून सोन्याची चेन खेचून नेली होती. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाच्या परिसरातील तसेच आरोपीत पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण यांच्याआधारे आरोपी अब्दुल मोचीन इद्रिस खान (२८) आणि मोहम्मद झिशान अब्दुल अबरार अहमद (३४) या दोघांना भांडूप येथून व चेतन सुरेश वाघ ऊर्फ कोबरा ऊर्फ सैफ (२४) याला दिवा येथून अटक केले आहे. आरोपीकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची कार हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी चोरी केलेली सोन्याची चेन कांजुरमार्ग येथे गहाण ठेवल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच अटक आरोपीकडे केलेल्या तपासात त्यांनी अशाच प्रकारे सफाळे येथे जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

टॅग्स :ArrestअटकChain Snatchingसोनसाखळी चोरी