शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुऱ्हाडीने हल्ला चढवून हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:48 IST

बाकावर बसून असलेल्या तरुणावर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या एका आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली.

ठळक मुद्देतरुण गंभीर जखमी : कोतवालीत घटना, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाकावर बसून असलेल्या तरुणावर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या एका आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास कोतवालीत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. रूपचंद बिरजू चंद्रवंशी (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील पंचशीलनगरात राहतो.गंगाबाई घाट भुतेश्वरनगरात राहणारा पंकज जयसिंगराव घोडिंगे (वय २०) याच्यासोबत आरोपी रूपचंदचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आरोपी रूपचंद सनकी स्वभावाचा असून, दारूच्या नशेत तो मनोरुग्णासारखाही वागतो, असे पोलीस सांगतात. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास पंकज त्याच्या घराजवळ असलेल्या साई शंकर मंदिराशेजारी, लोखंडी बाकावर बसून होता. आरोपी रूपचंद कुऱ्हाड घेऊन तेथे पोहचला आणि त्याने पंकजवर हल्ला चढवला. डोक्यावर, कपाळावर वार करून पंकजला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. पंकज त्या बाकावर निपचित पडला असताना आरोपी हातात कुऱ्हाड घेऊन आरडाओरड करीत दहशत पसरवीत होता. त्याची आरडाओरड ऐकून तेथे मोठी गर्दी जमली. गर्दीतील एकाने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला, तर एकाने पोलिसांना कळविले. पोलिसांचे पथक तेथे पोहचताच आरोपी रूपचंद बेशुद्ध पडल्याचे नाटक करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी पंकजला मेयोत दाखल करण्यात आले. सुनीता जयसिंगराव घोडिंगे (वय ३८) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी रूपचंदविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक