शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 11:05 PM

Murder, crime news दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील सावळी शिवारातील घटना : तीन आराेपी अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्ककाटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (पर्बत) शिवारात गुरुवारी रात्री घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अंगद ऊर्फ बिट्टू अशोक कडूकर (२८, रिधाेरा, ता. काटाेल) असे मृताचे तर अक्षय रामदास घिचेरिया (३१, रा़ रेस्ट हाऊसजवळ काटोल), मंगेश एकनाथ जिचकार (३२, रा़ धवड लेआऊट, काटाेल) व गणेश चिरकुट नैताम (५२, रा़ धर्मशाळामागे, तारबाजार काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ अंगद हा अमाेल नागपुरे व वैभव हिवसे दाेघेही रा. रिधाेरा यांच्यासाेबत गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच-०४/एडब्ल्यू-५१२३ क्रमांकाच्या क्वाॅलीसने जेवण करण्यासाठी काटाेल येथील झुनका भाकर केंद्रात आले हाेते. ती क्वाॅलीस अंगदच्या मालकीची आहे. तिथे तिघेही दारू पीत बसले. जवळच वैभवचा मित्र आराेपी मंगेश व त्याचे मित्र अक्षय व गणेश दारू पीत हाेते.दरम्यान, वैभवला दारू जास्त चढली असून, त्याला गावाला साेडून देण्याची बतावणी करीत मंगेश, अक्षय व गणेश क्वाॅलीसमध्ये बसले. अमाेल मात्र झुनका भाकर केंद्रातच हाेता. हे पाचही जण रिधाेऱ्याच्या दिशेने निघाले आणि परत काटाेल आले. त्यांनी वैभवला काटाेल येथील बसस्थानकाजवळ साेडले व तिघेही अंगदला घेऊन डाेंगरगावकडे निघून गेले. त्या तिघांनीही अंगदला क्वाॅलीसमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला परत सावळी (पर्बत) शिवारात आणले व तिथे राेडलगत फेकून तिघांनीही घर गाठले.

आराेपींपैकी एकाने या कृत्याबाबत एकाला सांगितले. त्यामुळे कुणाला मारले हे बघण्यासाठी तिन्ही आराेपी व अन्य दाेघे माेटरसायकलने सावळी (पर्बत) शिवारात पाेहाेचले. त्यांनी अंगदचा शाेध घेताला. ताे जिवंत असल्याचे दिसून येताच अक्षयने त्याचा चाकून गळा चिरला. त्यानंतर काटाेलला परत येऊन त्यांनी साेबत पेट्राेल व टायर घेऊन घटनास्थळ गाठले. तिघांनीही अंगदच्या अंगावर पेट्राेल ओतून व टायर ठेवून त्याचा जाळले, अशी माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.खुनाचे कारण अस्पष्टअंगद रात्री घरी परत न असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. ताे आराेपींसाेबत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आराेपींना अंगदबाबत विचारपूस केली. मात्र, ताे यापूर्वीच गेल्याची माहिती आराेपींनी अंगदच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी क्वाॅलीसची बारकाईने पाहणी केली असता, त्यांना तुटफूट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अंगदसाेबत अनुचित प्रकार झाल्याचा त्यांना संशय आला. त्यातच अंगदचा खून करण्यात आल्याची माहिती देवेंद्र खरपुरियाने पाेलिसांना दिली. तिन्ही आराेपी अट्टल व्यसनी असून, त्यांनी अंगदचा खून नेमका कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.