शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुऱ्याच्या वादातून दिग्रस येथे एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 11:05 IST

पंढरी वायाळ व ऋषीकेश वायाळ यांनी तातेबा जायभाये यांच्यावर कुºहाड व लोकंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले.

देऊळगाव मही: देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड वायाळ शिवारात शेतीच्या वादातून दिग्रस बुद्रूक येथील एकाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना तीन जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.तातेबा लहानू जायभाये असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रारंभी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले. मात्र जालना येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी चार जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. दिग्रस बुद्रूक येथील तातेबा जायभाये आणि आरोपी पंढरी वायाळ यांची शेती जवळ जवळ आहे. मध्यंतरी आरोपीने मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना शेतीच्या धुºयाच्या वादातून शिवीगाळ केली होती. त्यानंतर हा वाद मिटविण्यात आला होता. दरम्यान, तीन जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास तातेबा जायभाये हे शेतातील त्यांच्या घरासमोर झोपलेले असताना पंढरी वायाळ व ऋषीकेश वायाळ यांनी तातेबा जायभाये यांच्यावर कुºहाड व लोकंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले. तातेबा जायभाये यांचा आरडा ओरडा ऐकू आला असता त्यांचा मुलगा, तातेबांची पत्नी व अन्य कुटुंबिया बाहेर आले असता हा संपूर्ण प्रकार त्यांना दिसला, असे पोलिस तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, गंभीर अवस्थेत तातेबा जायभाये यांना त्वरित देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालय व तेथून जालना येथे हलविण्यात आले असता जालना येथे त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृत व्यक्तीचे नातेवाईक मनोहर तातेबा जायभाये यांनी अंढेरा पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी चार जुलै रोजी टाकरखेड वायाळ येथील पंढरी रामभाऊ वायाळ आणि ऋषीकेश वायाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी