शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

माथाडी कामगाराच्या हत्येचा ८ वर्षांनंतर उलगडा, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 01:31 IST

Murder of Mathadi worker revealed after 8 years : पैसे लुटण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

नवी मुंबई :  एपीएमसीजवळ डिसेंबर २०१२ मध्ये आनंदा सुकाळे या माथाडी कामगाराची हत्या झाली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दशरथ कांबळे याला अटक केली आहे. पैसे लुटण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.तुर्भे एस. टी. डेपोच्या भूखंडावर २९ डिसेंबर २०१२ रोजी माथाडी कामगार आनंदा सुकाळे याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यावर वार करून नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे एपीएमसी परिसरात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले होते. आरोपी न सापडल्यामुळे ऑगस्ट २०१३ मध्ये या गुन्ह्याचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला होता. मे २०१६ मध्ये पुन्हा तपास सुरू केला व फेब्रुवारी २०१७ मध्ये तो पुन्हा बंद करण्यात आला. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी तपास न लागलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यावर लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यामुळे माथाडी कामगाराच्या हत्येच्या गुन्ह्याचाही पुन्हा तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, गणेश कराड व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला व तुर्भे येथे राहणाऱ्या दशरथ कांबळे उर्फ आप्पा याला अटक केली.

पथकाचे सर्वत्र कौतुकअटक केलेला आरोपी हा मयत आनंदा याच्या परिचयाचा होता. आनंदा हा जुगारात २५ हजार रुपये जिंकला होता. ते पैसे लुटण्यासाठी आरोपीने भाजीपाला मार्केटमध्ये त्याच्यावर हल्ला केला व त्याचा खून केला. मृतदेह नाल्याजवळ गवताने झाकून ठेवला. दुसऱ्या दिवशी मृतदेह रिक्षात ठेवून तो एस. टी. डेपोच्या भूखंडावर टाकून पसार झाला. आरोपीवर यापूर्वीही जबरी चोरी, चोरी, दरोडा असे गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपारही केले होते. आठ वर्षांपासून तो तपास यंत्रणेला गुंगारा देत होता. फाईल बंद झालेल्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केल्यामुळे तपास करणाऱ्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एपीएमसीत प्रक्षोभक वातावरणया घटनेमुळे एपीएमसी परिसरात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले होते. आरोपी न सापडल्यामुळे ऑगस्ट २०१३ मध्ये या गुन्ह्याचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला होता