शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीचा दगडाने ठेचून हत्या करून रचला चोरीचा बनाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 12:38 IST

कन्नड-शिवूर बंगला रस्त्यावरील हसनखेडा (ता. कन्नड) शिवारातील शेतमळ्यातील अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देआरोपींनी चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे भासविण्यासाठी  घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले. पोलिसांचा तपास सुरु असून खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही.

औरंगाबाद : कन्नड-शिवूर बंगला रस्त्यावरील हसनखेडा (ता. कन्नड) शिवारातील शेतमळ्यातील  अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आरोपींनी चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे भासविण्यासाठी  घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले. मात्र, खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कारभारी रामचंद्र शिनगारे, यमुनाबाई शिनगारे असे खून झालेल्या पती, पत्नीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक येथील ते रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की, हनसखेडा येथील गावातील एक महिला सकाळी १०.३० च्या सुमारास शेतात कामासाठी राजेंद्र दळवी यांच्या शेतातील घरापासून जात असताना त्यांना पती, पत्नीचे मृतदेह घरासमोरील अगंणात रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. त्यांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली. यानंतर त्वरित देवगाव रंगारी पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. काही वेळातच सपोनि. सपना शहापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शिनगारे कुटुंबीय १५ वर्षांपासून राजेंद्र दळवी यांची हसनखेडा शिवारातील गट क्र.७९ मधील शेती अर्ध्या वाट्याने करीत होते. पती, पत्नी रात्री शेतातील राहत्या घरातील अंगणात खाटेवर झोपले होते. रात्री आरोपींनी झोपेतच असताना डोक्यात दगड घालून हत्या केली. मयतांची दोन्ही मुले औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत काम करतात. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अविनाश सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउनि. सचिन कापुरे, पी.एस. मुंडे, विद्या झिरपे, बी. बी. खुळे, के. एन. श्रीखंडे, के. के. गवळी, एस. टी. वाघ, व्ही. एस. धुमाळ, जी. ई. जाधव, राम मोकळे, आर.बी. खोजेकर, अमोल करवंदे, सुनील दांडगे, आर. टी. बुधवंत, रतन वारे, विठ्ठल राख, बाबासाहेब पाथरीकर, गणेश मुले, आशिष जमदाडे, किरण मोरे, बाबासाहेब नवले, शेख नदीम, राजेंद्र जोशी, प्रमोद चाळणे यांच्यासह श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

वीजपुरवठा खंडित करून काढला काटासदर मारेकऱ्यांनी रात्री उजेडात ओळख पटू नये म्हणून खून करण्यापूर्वी येथील वीजपुरवठा खंडित केला होता. यानंतर दगडाने ठेचून पती, पत्नीची हत्या करण्यात आली. यानंतर दगड शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तपासाला वेगळी दिशा देण्यासाठी घरातील असलेल्या कपाटातील वस्तू केवळ खाली फेकण्यात आल्या, तसेच कपडे अस्ताव्यस्त करण्यात आले.  दरम्यान, मयतांचे शवविच्छेदन हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करणे सुरू होते. अधिक तपास सपोनि. शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोकॉ. कारभारी गवळी, जमादार खुळे पाटील, पोहेकॉ. एस.जी. गव्हाणे, पोकॉ. दादासाहेब चेळेकर करीत आहेत.