शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून प्रियकर आणि मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढला; डोंबिवलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 08:17 IST

Crime News: मानपाडा येथील त्रिमूर्ती अपार्टमेंट येथे राहणारे प्रवीण पाटील (३०) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी लक्ष्मी हिने ४ जूनला मानपाडा पोलीस ठाण्यात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. विशेष म्हणजे पती बेपत्ता झाल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नीने केली होती. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करीत या गुन्ह्याची उकल करत पत्नी व तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारास अटक करून मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.

मानपाडा येथील त्रिमूर्ती अपार्टमेंट येथे राहणारे प्रवीण पाटील (३०) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी लक्ष्मी हिने ४ जूनला मानपाडा पोलीस ठाण्यात दिली. याचा मानपाडा पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी लक्ष्मी हिला बोलावले असता, तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. दरम्यान, तिच्या संपर्कातील अरविंद ऊर्फ मारी रवींद्र राम व सनी सागर यांची चौकशी केली असता अरविंदचे लक्ष्मीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले.

प्रवीण हे लक्ष्मीवर संशय घेऊन तिला त्रास देत होते. त्याची माहिती लक्ष्मीने २ जूनला अरविंदला दिली असता, तो प्रवीण यांच्या घरी गेला व त्यांना घेऊन स्वत:च्या घरी आला. अरविंदच्या घरी लक्ष्मीला पाहून प्रवीण यांना राग आला. पती-पत्नीमध्ये तेथे भांडण सुरू झाले. यावेळी अरविंद आणि सनी यांनीही लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत प्रवीण यांचा गळ्यावर चाकूने वार करून ठार मारले. मध्यरात्री प्रवीण यांचा मृतदेह चटईमध्ये गुंडाळून रिक्षाने शेलू गावाजवळील मोरीखाली टाकून दिल्याची माहिती तपासात उघड झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून यांनी सांगितले.  

आरोपी रिक्षाचालकयातील आरोपी पत्नी लक्ष्मी आणि प्रियकर अरविंद आणि त्याचा मित्र सनी हे तिघेही रिक्षाचालक आहेत. रिक्षाच्या व्यवसायातच लक्ष्मी व अरविंद यांचे प्रेमप्रकरण जुळले. पण प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रवीणचा काटा दोघांनी सनीची मदतीने काढला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली