शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपयांसाठी भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाची हत्या, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 07:03 IST

दादरमध्ये १० रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने ग्राहकाची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी भाजी विक्रेता सोनीलाल सुखदेव महंतो (२५) याला अटक केली आहे.

मुंबई  - दादरमध्ये १० रुपयांच्या वादातून भाजी विक्रेत्याने ग्राहकाची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी भाजी विक्रेता सोनीलाल सुखदेव महंतो (२५) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतो हा दादर रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक १च्या बाहेर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या इसमाचे नाव हनीफ मोहम्मद अस्लम सिद्दिकी (३५) असे आहे. ते साकीनाका येथे राहत असून, चर्नी रोड परिसरात कंत्राटी पद्धतीने कारपेंटरचे काम करायचे.सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम उरकून ते घरी निघाले. सोबत भाजी घेऊन जावी, म्हणून त्यांनी महंतोकडून भाजी खरेदी केली आणि १० रुपयांची जुनी, फाटलेली नोट दिली. मात्र, महंतोने ती नोट स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याच वादात महंतोने रागाच्या भरात भाजी कापण्याच्या चाकूने सिद्दिकीवर दोन वेळा वार केले. त्यांच्या छातीवर गंभीर दुखापत करत, महंतोने पळ काढला.स्थानिकांच्या मदतीने सिद्दिकी यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी महंतोविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. महंतो हा सीएसएमटी रेल्वे स्थानकातून टेÑनने पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्यापूर्वीच शिवाजी पार्क पोलिसांनी तेथून त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जुन्या नोटेमुळे वादसिद्दिकी यांनी दिलेली १० रुपयांची नोट जुनी तसेच फाटकी असल्याने महंतोने ती घेण्यास नकार दिला. त्यामुळेच हा वाद होऊन अखेर त्याचे पर्यवसान हत्येत झाले.

टॅग्स :Murderखून