शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पेटवून हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीची निर्दोष मुक्तता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 21:14 IST

जुआरीनगर येथे घडली होती घटना

ठळक मुद्देमयत संगिता हिने मृत्यूपूर्व जबाबात सुरुवातील आपल्याला पतीने केरोसिन ओतल्याचे म्हटले होते. सरकार पक्षातर्फे न्यायालयात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.  

मडगाव - स्वत: च्या पत्नीवर केरोसीन ओतून तिला पेटवून ठार मारल्याच्या आरोपाखाली मूळ बिहार येथील शामसुंदर पांडे (३७) या संशयिताची निर्दोष सुटका झाली. मयताच्या मृत्यूपुर्व स्वेच्छा जबानीत तफावत आढळून आल्याने त्याच्यावरील खुनाचा गुन्हा न्यायालयात सिध्द होउ शकला नाही. गोव्यातील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने आज गुरुवारी संशयिताला निर्दोष मुक्त केले. मयत संगिता हिने मृत्यूपूर्व जबाबात सुरुवातील आपल्याला पतीने केरोसिन ओतल्याचे म्हटले होते. 

मात्र नंतर मामलेदाराकडे दिलेल्या स्वेच्छा जबानीत आपण स्वत आग लावून घेतल्याचे म्हटले होते. संशयिताच्यावतीने वकील प्रियेश मडकईकर यांनी बाजू मांडली.वेर्णा पोलिसांनी शामसुंदर पांडे याच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या ३0२ कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. वेर्णा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक निनाद देउळकर यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता. पांडे याच्यावर त्याची पत्नी संगिता देवी पांडे (३६) हिच्यावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिल्याचा आरोप होता. ६ डिसेंबर २0१८ साली झारिंत - जुवारीनगर येथे ही घटना घडली होती. मागाहून संगिता हिचा ११ डिसेंबरला गोमेकॉत मृत्यू झाला होता.

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, शामसुंदर हा संजिना कुमार या महिलेकडे भाडेकरु म्हणून रहात होते. पत्नीला पेटवून दिल्यानतंर त्याने घटनास्थळाहून पोबारा केला होता. वास्को रेल्वे स्थानकावर जात असताना खाली पडल्याने तो जखमी झाला होता. वास्को पोलीस ठाण्याच्या रॉबर्ट व्हॅनमधून नंतर त्याला उपचारासाठी चिखली येथील कॉटेज इस्पितळात दाखल केले होते. नंतर गोमेकॉत त्याला उपचारासाठी पाठवून दिले होते. सरकार पक्षातर्फे न्यायालयात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.  

टॅग्स :MurderखूनgoaगोवाCourtन्यायालय