शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील बेपत्ता मुलीचा फेसबुकमुळे लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:54 IST

तीन वर्षांपूर्वी केले होते घरातून पलायन : कौटुंबिक कलहामुळे घेतला निर्णय, अपहरण नसून स्वत: घरातून गेल्याचे केले मान्य

ठाणे : गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले. तिला शोधण्यासाठी मोबाइलवरील एक अ‍ॅप आणि फेसबुकच्या आधार घेतला गेला. आपले कोणीही अपहरण केले नव्हते. कौटुंबिक कलहामुळे घरातून निघून गेल्याची कबुली तिने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंब्रा येथील एका ४० वर्षीय महिलेच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार ५ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी ७ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या मुलीचा शोध लागत नसल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाले होते. याच मुलीची मोठी बहीण आणि तिच्या पतीने १० दिवसांपूर्वी टिकटॉक या अ‍ॅपवर भोजपुरी गाण्याचा एकत्रित व्हिडीओ अपलोड केला होता. तो पाहून या मुलीने मेहुण्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्याच्याशी तिने मेसेंजरमार्फत चॅटिंग केले. त्याचवेळी तिने घरातील इतरांचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या मुलीच्या मेहुण्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा, ती अभय शेट्टी या बनावट नावाच्या फेसबुक अकाउंटवरून त्याच्याशी चॅटिंग करत असल्याचे उघड झाले. त्याचवेळी पोलिसांनी शक्कल लढवून मेहुण्याची सासू अर्थात तिची आई आजारी असल्याचा तिला मेसेज पाठवला. हा मेसेज पाहिल्यानंतर तिने व्हिडीओ कॉल केला.

त्याचवेळी ती अभय शेट्टी नसून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी असल्याचे तिनेच मान्य केले. तिने भेटायला येण्याचेही मान्य केले. ती २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता तिच्या चरईतील बहिणीला भेटण्यासाठी आली, तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आता कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.गुजरातमध्ये करायची कामघरातून कौटुंबिक कलहामुळे निघून गेल्यानंतर गोरेगाव येथे वास्तव्याला होती. त्यानंतर, ती कॅटरिंगच्या कामासाठी सुरत (गुजरात) येथे गेली. गुजरात येथून वसईमध्ये आठ ते नऊ महिने राहिली. सध्या ती नालासोपारा येथे राहत होती. तेथेही कॅटरिंगची विविध कामे ती करत असे.