शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत फेसबुकवरून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पतीने विरोध करताच आरोपीचं भयंकर कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 22:35 IST

पीडित महिला लग्नाआधी २०१५ ते २०२१ यादरम्यान आपल्या आजीसोबत उल्हासनगर इथं वास्तव्यास होती. तिथंच तिचा आरोपीशी संपर्क आला होता.

Mumbai Crime ( Marathi News ) : फेसबुक फ्रेंड असणाऱ्या व्यक्तीने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. ही बाब सदर महिलेच्या पतीला कळताच त्याने आरोपीला पुन्हा असं कृत्य न करण्याची तंबी दिली. मात्र यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने महिलेच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना मुंबईत घडली आहे.

भांडुप पूर्वेत राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने शुक्रवारी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टमधून त्याने चुंबन आणि शरीरसुखाची मागणी केली होती. सदर महिला आणि तिचा पती हे दोघेही एकच मोबाइल वापरत असल्याने आरोपीने टाकलेली फेसबुक पोस्ट पतीच्याही नजरेस आली. आरोपी ओळखीचा असल्याने महिला आणि तिचा पती आरोपीच्या घरी गेले. मात्र तिथं जाताच आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेच्या पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आरोपीसोबत कधी झाली ओळख? पीडित महिला लग्नाआधी २०१५ ते २०२१ यादरम्यान आपल्या आजीसोबत उल्हासनगर इथं वास्तव्यास होती. तिथंच तिचा आरोपीशी संपर्क आला होता. त्यानंतर दोघे फेसबुकवर फ्रेंड झाले. मात्र या ओळखीचा गैरफायदा घेऊन आता आरोपीने फेसबुकवरून शरीरसुखाची मागणी केली आणि नंतर महिलेच्या पतीवर चाकूहल्लाही केला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीसWomenमहिला