शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जच्या विळख्यात मुंबई! ‘न्याहरी’ कोडवर्ड वापरला की नशेबाजांना मिळते हवे ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:42 IST

दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहीम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या शहरातील नशेबाजांमध्ये ‘न्याहरी’ हा कोडवर्ड वापरला जात आहे. हा कोडवर्ड कानात सांगितला की, रस्त्यावरच्या टपऱ्यांमध्ये विकला जाणारा गांजा सहज मिळतो. माटुंगा रोड स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एक महिला खुलेआम ड्रग्ज विक्री करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

माटुंगा रोड स्थानकालगत असलेल्या सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या या महिलेकडून गेल्या अनेक वर्षांपासून गांजाची विक्री होत आहे.  पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईही करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहीम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. दुसरीकडे माटुंगा स्टेशन परिसरालगतही एक महिला गांजा विक्री करत होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या ४ महिन्यांपासून तिच्या ड्रग्ज विक्रीला ब्रेक लागला आहे.  

 फक्त ५ मिनिटे लागतात शोधायला...गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाकडे ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती घ्यायला किती वेळ लागतो, असे विचारताच कुठल्याही नवीन ठिकाणी अवघ्या ५ मिनिटांत ड्रग्जची माहिती मिळत असल्याचे त्याने सांगितले.

माटुंगा पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर काही ठिकाणी रेल्वेजवळील झोपड्यांवर यापूर्वीही पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून कारवाई झाली आहे. मात्र, अतिक्रमण करणारे लोक पुन्हा झोपड्या उभारतात. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील सर्वच झोपड्यांवर कारवाई अपेक्षित आहे. - शीतल देसाई, माजी नगरसेविका   

वेळोवेळी कारवाईसंबंधित महिलेबाबत तक्रार येताच दोन दिवसांपूर्वीच झाडाझडती घेण्यात आली. तसेच, यापूर्वीही वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आमचे पथक लक्ष ठेवून आहे. संबंधित महिला ड्रग्ज विकताना आढळून आल्यास थेट गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात येईल.- प्रवीण कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माहीम पोलिस ठाणे

टॅग्स :Drugsअमली पदार्थ