शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोटार सायकल चोरटा सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात, १६ लाखांच्या १३ मोटार सायकल हस्तगत

By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2023 17:47 IST

शुभम पवार हा मूळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे.

कल्याण - कल्याण आणि डोंबिवली परिसरात उभ्या करुन ठेवलेल्या मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटय़ास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव शुभम भास्कर पवार (१९) असे आहे. तो भिवंडीतील राजनोली परिसरात राहत होता. त्याने चोरी केलेल्या १६ लाख रुपये किंमतीच्या १३ मोटार सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 

शुभम पवार हा मूळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे. तो भिवंडी येथील राजनोली परिसरात राहत होता. तो कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरातील मोटार सायकल हेरायचा. ज्या मोटार सायकल लॉक केलेल्या नसायच्या त्याच मोटार सायकल चोरी करुन तो पसार व्हायचा. त्याने आत्तापर्यंत १३ मोटार सायकल चोरी केल्या होत्या. त्यात चार बुलेट होत्या. ज्या महागडय़ा आहेत. या चोरीच्या गाडय़ा तो अन्य ठिकाणी जाऊन विकायचा. 

महात्मा फुले, विष्णूनगर, डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात मोटार सायकलचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणात कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा तपास करीत होती. पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या प्रकरणात सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा कल्याण स्टेशन परिसरातील  एक सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये शुभम हा मोटार सायकल चोरी करुन नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शुभमला भिवंडी राजनोली येथून अटक केली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे किशोर शिरसाट यांच्या पथकानेही शुभमला अटक केली आहे. ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण