शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरीण...सात वर्षाच्या मुलीला दिले सराट्याने चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 18:45 IST

निर्दयी मातेने तिच्या पोटच्या सात वर्षीय मुलीला पार्श्वभागावर तापलेल्या सराटयाने चटके दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देआईला न सांगता आजी-आजोबांकडे जात असल्याने मुलीचा केला अनन्वित छळ. माहिती शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन मुलीला ताब्यात घेतले.

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथील रहिवासी एका निर्दयी मातेने तिच्या सात वर्षाच्या मुलीला पार्श्वभागावर तापलेल्या सराट्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. आईला न सांगता शेजारी राहत असलेल्या आजी-आजोबांकडे ही मुलगी जात असल्यामुळे तिच्या मातेने हा प्रकार केल्याची माहिती जुने शहर पोलिसांनी दिली.शिवसेना वसाहत येथील रहिवासी नीता मोहन आपोतीकर (वय ३८) हिला रोहिणी नावाची सात वर्षाची मुलगी आहे. रोहिणी तिच्या आईला न सांगता बाजूलाच राहत असलेल्या आजी-आजोबांकडे राहावयास जात होती, हा प्रकार मुलीची आई नीताला न पटल्यामुळे तिने मुलीला शुक्रवारी गरम सराटा करून चटके दिले. यामध्ये मुलीचा पार्श्वभाग गंभीररीत्या जळाला आहे. नीता आपोतीकर हिने पोटच्या मुलीला चटके दिल्याची माहिती शेजाऱ्यांना समजल्यावर त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला.सदर घटनेची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने जुने शहर पोलिसांना सोबत घेऊन मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यानंतर मुलीची आई नीता मोहन आपोतीकर हिच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ आणि जस्टीस जुवेनाइल अ‍ॅक्टच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.ठाणेदारांनी विकत घेतले टीटीचे इंजेक्शनशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गंभीर जळालेल्या चिमुकलीला उपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात मुलीवर उपचारासाठी आवश्यक असलेले टीटीचे इंजेक्शनच उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे ठाणेदार अन्वर शेख यांनी शहरातील मेडिकल दुकानामध्ये जाऊन १८ टीटीचे इंजेक्शन खरेदी केले. त्यानंतर सदर इंजेक्शन रुग्णालय प्रशासनाकडे दिले.मुलीने बयान बदलविलेसात वर्षे चिमुकली रोहिणी हिला पोलिसांनी विचारल्यावर तिने सुरुवातीला आईनेच चटके दिल्याची माहिती पोलिसांना दिली; मात्र वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर काही वेळातच चुलीवर पडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र त्यानंतरही पोलिसांनी तिची आई नीता हिची चौकशी सुरू केली आहे, मुलीने बयान बदल्यामुळे पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी