लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या नवजात बाळाला बेवारसपणे फेकल्याची घटना उजेडात आली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी नवजात बाळाच्या आईचे जावई, चुलत बहिण आणि ननंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गिट्टीखदानच्या दाभामध्ये ही घटना घडली आहे. रामकिसन बेनीराम चौधरी (३५), लक्ष्मी रामकिसन चौधरी (३२) आणि सजावती बेनीराम चौधरी (२२) अशी आरोपींची नावे आहेत. रामकिसन आणि त्याची पत्नी लक्ष्मी मुळचे बालाघाटचे रहिवासी आहेत. सजावती रामकिसनची बहिण आहे. तिघेही नागपुरात मजुरी करतात. रामकिसनला तीन मुले आहेत. तीघेही लहाण असल्यामुळे रामकिसनने लक्ष्मीची चुलत बहिण पुजा (२१) हिला मुलांची देखभाल करण्यासाठी आणले होते. दरम्यान रामकिसनने पुजासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यामुळे पुजा गर्भवती झाली. ती गर्भवती असल्याची बाब लपविण्यासाठी आरोपींनी पुजाचे बाहेर येणे जाणे बंद केले. गुरुवारी पुजाने मुलाला जन्म दिला. आरोपींनी तिची प्रसुती घरातच केली. रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच प्रसुती केल्यामुळे पुजा आणि बाळाची प्रकृती बिघडली. त्यावरही आरोपी गंभीर झाले नाहीत. त्यामुळे जन्म झाल्यानंतर काही वेळाने बाळाचा जीव गेला. त्यावर आरोपी बाळाची विल्हेवाट लावण्याच्या कामात लागले. आरोपींनी रात्री १२.३० वाजता बाळाला सुखसागर सोसायटीजवळ मातीच्या ढिगावर ठेवले आणि तेथून निघून आले. त्यावर आरोपींच्या शेजाऱ्यांना पुजाची प्रसुती झाल्याची माहिती मिळाली. बाळ दिसत नसल्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी नियंत्रण कक्षाला सूचना दिली. उपनिरीक्षक सावंत सहकाºयांसह तेथे पोहोचले. पुजा बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांनी आरोपींना बाळाबद्दल विचारना केली. सुरुवातीला ते पोलिसांची दिशाभूल करीत होते. परंतु पोलिसांनी कडक शब्दात विचारना केल्यानंतर त्यांनी खरी माहिती सांगितली. त्या आधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून रामकिसनला अटक केली. त्याने पुजाला रुग्णालयात दाखल केले असते तर बाळाचा जीव वाचला असता. आपल्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी त्याने बाळाचा जीव घेतला.
नागपुरात मेव्हणीला बनविले आई, नवजात बाळाला बेवारस फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 22:42 IST
अनैतिक संबंधातून जन्म झालेल्या नवजात बाळाला बेवारसपणे फेकल्याची घटना उजेडात आली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी नवजात बाळाच्या आईचे जावई, चुलत बहिण आणि ननंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात मेव्हणीला बनविले आई, नवजात बाळाला बेवारस फेकले
ठळक मुद्देआरोपी जावयास अटक : गिट्टीखदानमधील घटना