शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१३ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 17:35 IST

Mother attempts suicide by killing 13-month-old girl : प्रियंका बोबडे हिने झोपलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली.

ठळक मुद्देपतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखलकौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय

अकोला : पोटच्या १३ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या करून आईने हाताची नस कापून व गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात पतीच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. काैटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.

येथून जवळच असलेल्या बाभुळगाव येथील प्रियंका उमेश बोबडे (२६) हिला १३ महिन्यांची अधिरा नावाची एक मुलगी होती. पती व कुटुंबासह ती बाभुळगाव येथे राहते. सोमवारी दुपारच्या सुमारास प्रियंका बोबडे हिने झोपलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिने स्वत:च्या हाताची नस कापली. परंतु यामुळे प्राण जाणार नाही, असे लक्षात आल्यावर तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पती व कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. प्रियंकाला रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात भरती केले आहे. या प्रकरणात सोमवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसांनी पतीच्या तक्रारीनुसार प्रियंका बोबडे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, मुलीच्या हत्येमागील तसेच महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर वानखडे करीत आहेत.

महिलेने मुलीची हत्या का केली, यामागील कारण पुढे आले नाही. पतीची चौकशी केली असता त्याने, पत्नी माहेरी गेली होती. तेथून परत आल्यावर तिने हा प्रकार केला, असे सांगितले. काैटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. महिला शुद्धीवर आल्यावरच घटनेमागील कारणांचा उलगडा होईल.

- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला