शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थविरोधी कारवाईत 15 हून अधिक जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 09:19 IST

मुंबई, नवी मुंबईत चार ठिकाणी ‘एनसीबी’चे छापे : रात्री उशिरापर्यंत कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि नवी मुंबईमध्ये शुक्रवारी चार ठिकाणी छापे टाकून १५ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. यात ३ नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा समावेश आहे. एनसीबीने या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळते आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.एनसीबीने गेल्या आठवड्यात हार्बर लाइनवरील मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या तस्करांवर कारवाई करत, हेरॉईन, कोकेन आणि एमडी असे १ कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. कारवाईच्या वेळी ड्रग्ज तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एनसीबीच्या पथकातील पाच कर्मचारी जखमी झाले होते. एनसीबीने नायजेरियन ड्रग्ज तस्कर ओबिओरा एक्वेलार याला अटक करून पसार झालेल्या आणखी चार तस्करांचा शोध सुरू केला होता. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी कारवाई केल्याची माहिती मिळते आहे.शुक्रवारी सकाळपासून एनसीबीची कारवाई सुरू आहे. यात आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.

दोन ठिकाणच्या कारवाईत सव्वाचार कोटींचे ड्रग्ज जप्त

nगुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) खार, धारावी व दिंडोशीत केलेल्या कारवाईतून सव्वाचार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. यात तरुणांना कोकेन पुरविणाऱ्या नायजेरियन नागरिकालाही बेड्या ठोकल्या आहेत. इनोसेंट लोरेन्स (वय ३३) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय टोळीत सक्रिय आहे. एएनसीच्या वांद्रे कक्षाने खारमधून लोरेन्सला गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून ३ कोटी ९० लाख किमतीचे १ किलो ३०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. nआझाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईत २४ तारखेला मालाडच्या अशरफ अजगर सय्यद (३०) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १० लाख ८ हजार रुपये किमतीचे चरस जप्त केले आहे. त्याच्या चौकशीत हे ड्रग्ज मोहम्मद इरफान शेख याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने शेखला अटक केली. त्याच्याकडे १६ लाख २० हजार रुपये किमतीचे चरस सापडले. दोन्ही कारवायांत एकूण २६ लाख २८ हजार किमतीचा १ किलो ३१४ ग्रॅम साठा मिळाला. तो बिहारमधून चरस आणून त्याची विक्री करत होता.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ