शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Delkar Suicide: गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 07:28 IST

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण: मोहन डेलकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांच्यावर आहे

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मोहन डेलकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांच्यावर आहे. या आरोपात तथ्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. यावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.

डेलकर हे दादरा नगर या केंद्रशासित प्रदेशाचे खासदार होते. त्यांनी मरीन ड्रॉईव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांची सुसाईड नोट पोलिसांना सापडली. डेलकर यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला. अभिनव डेलकर याने केलेल्या तक्रारीनुसार, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल आणि स्थानिक सरकारी अधिकारी यांनी डेलकर यांची छळवणूक केली होती. कारण त्यांना निवडणूक लढवण्यापासून डेलकर यांना अडवायचे होते. तसेच त्यांच्या महाविद्यालयाचा ताबा घेण्यापासून थांबवायचे होते.

‘आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी कट रचण्याची आवश्यकता आहे, ते या प्रकरणात दिसत नाही. केवळ छळवणुकीचा आरोप केला म्हणून पोलीस कोणावरही आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करू शकत नाही. सिंह यांच्यावर कोणताही विशिष्ट आरोप ठेवण्यात आलेला नाही. ते डेलकर यांना वैयक्तिकरीत्या ओळखत नव्हते. डेलकर अध्यक्ष असलेल्या ट्रस्टची ते चौकशी करत होते, एवढाच सिंह आणि डेलकर यांचा परिचय होता’, असा युक्तिवाद सिंह यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने पुढील सुनावणी गुरुवारी ठेवत तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय